मुंबई, 15 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) एकदिवसीय विश्वचषकातील उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव केला आहे. याबरोबरच भारताने विश्वचषक 2023 च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. भारतीय संघ आता 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादमध्ये अंतिम सामना खेळणार आहे. भारताचा अंतिम फेरीत सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेत्यासोबत होणार आहे. गेल्या वेळी 2019 च्या विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पराभव केला होता. या पराभवाचा बदला भारतीय संघाने आज घेतला आहे.
मुख्यमंत्री शिंदेंनी गडचिरोलीतील अतिदुर्गम भागात दिवाळी साजरी केली
तत्पूर्वी या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करीत न्युझीलंडसमोर विजयासाठी 398 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ 48.5 षटकांत 327 धावांत सर्वबाद झाला. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक 117 धावा केल्या. तर श्रेयस अय्यरने 105 धावांची तुफानी खेळी केली. सोबतच शुभमन गिलने नाबाद 80 धावा केल्या. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने 3 आणि ट्रेंट बोल्टने 1 विकेट घेतली.
बाबर आझमने पाकिस्तानच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला
तर प्रत्युत्तरात खेळताना न्यूझीलंडच्या डावाची सुरूवात खराब झाली. त्यांचे दोन्ही सलामीवीर डेव्हॉन कॉनवे आणि रचिन रवींद्र हे लवकर बाद झाले. तेंव्हा न्यूझीलंडची धावसंख्या 2 बाद 39 इतकी होती. त्यानंतर डॅरिल मिशेल आणि केन विल्यमसन यांनी तिसऱ्या विकेटसाठी 181 धावांची भागीदारी केली. न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेल याने 119 चेंडूत सर्वाधिक 134 धावा केल्या. या खेळीत त्याने 7 षटकार आणि 9 चौकार लगावले. याशिवाय कर्णधार केन विल्यमसनने 73 चेंडूत 69 धावांची खेळी केली. तर ग्लेन फिलिप्सने 33 चेंडूत 41 धावा केल्या. भारताकडून मोहम्मद शमीने 7 विकेट घेतल्या. या कामगिरीमुळे शमीला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला आहे. यासोबतच जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.
One Comment on “टीम इंडियाची अंतिम फेरीत धडक”