मुंबई, 03 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने काल श्रीलंकेवर 302 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयाबरोबर भारतीय संघाने या विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली आहे. कालच्या सामन्यातील विजयाचा शिल्पकार भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हा ठरला. शमी याने या सामन्यात 5 विकेट घेण्याची कामगिरी केली. त्याचबरोबर त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. शमीने कालच्या सामन्यात 5 षटकात 18 धावा देत 5 विकेट घेतल्या होत्या. त्यामुळे मोहम्मद शमी हा आता विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज बनला आहे. त्याने याबाबतीत झहीर खान आणि जवागल श्रीनाथ यांना मागे टाकले आहे. या दोघांनी विश्वचषक स्पर्धेत प्रत्येकी 44 विकेट घेतल्या होत्या.
शिष्टमंडळाला मोठे यश, जरांगे पाटलांनी उपोषण घेतले मागे
याशिवाय, मोहम्मद शमी हा विश्वचषकात सर्वाधिक वेळा 4 पेक्षा अधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. त्याने 7 वेळा ही कामगिरी केली आहे. तसेच मोहम्मद शमी हा एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक 5 विकेट घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याने 4 वेळा 5 विकेट घेतल्या आहेत. यासोबतच मोहम्मद शमीने एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक 5 विकेट घेण्याच्या मिचेल स्टार्क याच्या विक्रमाशी देखील बरोबरी केली आहे. या दोघांनी विश्वचषकात तीनदा 5 विकेट घेतल्या आहेत.
शिष्टमंडळाला मोठे यश, जरांगे पाटलांनी उपोषण घेतले मागे
तसेच, कालच्या सामन्यात अनेक विक्रम नोंदविण्यात आले आहेत. कालच्या सामन्यात श्रीलंकेचा डाव 55 धावांत संपुष्टात आला. श्रीलंकेची ही वनडेतील तिसरी छोटी धावसंख्या आहे. तसेच भारताविरुद्ध एकदिवसीय सामन्यातील ही दुसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. याशिवाय, भारताने श्रीलंकेवर 302 धावांनी विजय मिळवला होता. हा एकदिवसीय सामन्यांतील चौथा सर्वात मोठा विजय ठरला आहे. त्यामुळे हा सामना भारतीय संघासाठी खास ठरला आहे.
One Comment on “ऐतिहासिक विजयासह टीम इंडियाने केले हे रेकॉर्ड!”