बारामती, 30 सप्टेंबरः बारामती परिवहन कार्यालयाने वसुली टार्गेट पूर्ण केले असून फिरत्या पथकाने यावेळेस जास्तीचा दंड गोळा केला आहे. असे असताना ही बारामती आरटीओ विभागाला फिरत्या पथक कामगिरी समाधानकारक न झाल्याचे दिसून येत आहे. क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणारे ट्रक, ट्रॅक्टर कार्ड वाटपामुळे सर्रास रस्त्यावर फिरताना दिसताहेत.
पुणे जिल्ह्यातील पोलीस प्रतिमा जनसामान्यात मलीन
तांदुळवाडीत दारिद्र्य रेषेखालील मागासवर्गीयांचा मेळावा संपन्न
आयुमान संपलेले वाहने, अपघाती वाहने, नूतनीकरण न केलेली वाहने रस्त्यावर फिरताना दिसत आहे. बारामती तालुक्यात तर क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणारी रिक्षा, टमटम, बसेस, शाळेतील बसेस याकडे हेतुपुरस्कर दुर्लक्ष केले जात आहे. कर्मचारी कमी असल्याचे कारण सांगून फिरत्या पथकाचे कर्मचारी, अधिकारी यांची संख्या मर्यादित असल्याचे सांगितले जात आहेत.
विकसित होणाऱ्या बारामती, इंदापूर आणि दौंड या तालुक्यात उसाचा पट्ट असलेला तालुके म्हणून ओळखले जाते. ऑक्टोबर महिन्यामध्ये ऊस कारखाने चालू होत आहे. यामुळे कारखान्यांचे कार्ड चालू होतील. नियमबाह्य ऊस वाहतूक चालू होतील. अति कर्तव्यदक्ष फिरते पथक पोळ साहेब, साळुंके साहेब, गायकवाड साहेब हे अधिकारी व कर्मचारी किती कारखान्यांवर कारवाई करणार? हे काळच ठरवेल. दरम्यान, नियमबाह्य ऊस वाहतूक करताना या तालुक्यात अनेकांनी जीव गमविले आहेत. टार्गेट पूर्ण करताना लोकांचे सुरक्षितेचा प्राधान्य देण्यासाठी केस्कर आरटीओ साहेब प्रामाणिकपणे प्रयत्न करतील, हीच अपेक्षा!