बारामती, 6 ऑगस्टः (प्रतिनिधी- बाळासाहेब बालगुडे) मराठी पत्रकार परिषद मुंबई पुणे जिल्हा पत्रकार संघ संचलित बारामती तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी हेमंत गडकरी, तर खजिनदार पदी बाळासाहेब बालगुडे, कार्याध्यक्षपदी सचिन पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. बारामती तालुका मराठी पत्रकार संघाची द्वैवार्षिक निवडणूक प्रक्रिया बारामती तालुक्यातील मोरगाव येथील शिवांकूल मंगल कार्यालय येथे नुकतीच पार पडली. सदर निवड निवडणूक निर्णय अधिकारी राहुल शिंदे व सह निवडणूक निर्णय अधिकारी भरत निगडे यांनी जाहीर केली.
शहरातील ठराविक अतिक्रमणांवर पालिका मेहरबान?
मराठी पत्रकार परिषदेचे पुणे विभागीय निवडणूक प्रमुख बाळासाहेब ढसाळ व पुणे जिल्हा अध्यक्ष सुनील लोणकर यांच्या सूचनेनुसार बारामती तालुका मराठी पत्रकार परिषदेची द्वैवार्षिक निवडणूक प्रक्रिया पार पडली. अध्यक्ष पदासाठी हेमंत गडकरी, उपाध्यक्ष पदासाठी संभाजी काकडे, सचिव पदासाठी संदीप आढाव, खजिनदार पदासाठी बाळासाहेब बालगुडे व कार्याध्यक्ष पदासाठी सचिन पवार, कार्यकारिणी सदस्य पदासाठी आसिफ शेख, अमोल गायकवाड यांची नियोजित वेळेत प्रत्येकी एक अर्ज आल्याने सर्वांची बिनविरोध निवड करण्यात आली.
संभाजी भिडेंच्या वक्त्याव्याचे निषेधार्थ मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन
तसेच पत्रकार हल्ला विरोधी समितीच्या निमंत्रक पदी राजेश वाघ, जिल्हा प्रतिनिधी म्हणून चिंतामणी क्षीरसागर, वसंत मोरे यांची सर्वानुमते करण्यात आली. यावेळी जेष्ठ पत्रकार अशोक वेदपाठक, मनोहर तावरे, योगेश भोसले, प्रशांत धुमाळ, विजय भोसले, सतीश गावडे, अमर वाघ हे यावेळी उपस्थित होते.
2 Comments on “मराठी पत्रकार परिषदेची तालुका कार्यकारिणी जाहीर”