उन्हाळ्यामध्ये शरीरात डिहायड्रेशन होऊन त्वचेवर थकवा जाणवतो. हा थकवा दूर करण्यासाठी आपण अनेक प्रोडक्ट वापरतात. मात्र अनेकदा त्याचा काहीही फायदा होताना दिसत नाही. यासाठी सोपी आणि घरगुती उपायांची मदत घेऊ शकता. अगदी घरघुती फेसपॅकमुळे तुमची त्वचा तजेलदार दिसू शकते.
कोरफड
– कोरफड हे त्वचेसाठी उत्तम आणि खूप जास्त फायदेशीर मानले जाते. कोरफडमधील अँटीसेप्टिक आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म त्वचेला निरोगी ठेवण्याचे काम करतात. त्यामुळे कोरफडीचा आतला भाग तुम्ही फेसपॅक म्हणून वापरला तर त्याचा फायदा तुम्हाला नक्की होइल.
दही आणि ताजी मलई
– दही आणि ताजी मलई त्वचा ताजे तवानी ठेवण्यास मदत करते. या शिवाय दही लावल्याने त्वचेचा थकवा दूर होतो. तसेच चेहऱ्याचा रंगही सुधारतो. एका भांड्यात तीन ते चार चमचे दही घ्या आणि त्यात एक चमचा ताजी मलई घाला. हा पॅक चेहऱ्यावर लावा आणि मसाज करा. याचा तुम्हाला नक्की फायदा होईल.
कॉफी
– कॉफी ही गरम असते, मात्र कॉफीमधील घटक त्वचा सुधारण्यास मदत करतात. कोरडी आणि थकलेली त्वचा टवटवीत करण्यासाठी कॉफीमध्ये मधात मिसळून चेहऱ्यावर लावून 20 मिनिटे ठेवा आणि नंतर थंड पाण्याने तुमचा चेहरा धुवा. याचा तुम्हाला नक्की फायदा होईल.
केळी आणि मध
– केळी आणि मध आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असते. यामुळे त्वचा चमकदार बनते. एक वाटीत एक केळी मॅश करा आणि त्यात एक छोटा चमचा मध घाला. हा पॅक चेहऱ्यावर लावा आणि कोरडा राहू द्या. त्यानंतर थोड्या वेळाने चेहरा धुवा.
लिंबाचा रस, काकडी आणि गुलाब जल
– लिंबाचा रस, काकडी आणि गुलाब जल हे तिन्ही त्वचेसाठी खुप पोषक असतात. लिंबाचा रस, काकडी आणि गुलाब जल यांचा एकत्र फेसपॅक त्वचेसाठी उत्तम असतो. यासाठी एक मोठा चमचा लिंबाचा रस, एक मोठा चमचा काकडीचा रस, एक मोठा चमचा गुलाब जल घ्या. चांगल्या प्रकारे एकत्र मिसळा आणि टॅनिंग झालेल्या ठिकाणी त्वचेवर लावा. 12 मिनिटं हा पॅक लावून ठेवावा, नंतर धुवून टाका. असं दररोज करा.