टकारी समाजासाठी मोफत दाखले वितरण, अनेकांना लाभ

बारामती, 03 ऑक्टोबर: (अभिजित कांबळे) महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत भारतीय टकारी समाज संघ आयोजित टकारी समाज दाखले अडचण मुक्त सप्ताह साजरा केला. त्यामध्ये घेतलेल्या शिबिरामधून टकारी समाजातील 63 लाभार्थीना जातींचे दाखले वाटप करण्याचा कार्यक्रम जेष्ठ नागरिक सभागृह बारामती येथे तहसीलदार गणेश शिंदे यांच्या हस्ते पार पडला.



कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भारतीय टकारी समाज संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. अविनाश गायकवाड होते. तर प्रमुख पाहुणे नगरसेविका शितल गायकवाड, नगरसेवक बाळासाहेब गायकवाड राष्ट्रपती पोलीस पदक विजेते अनिल अण्णा जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला अध्यक्ष अनिताताई गायकवाड हे होते.



अल्प कालावधीत भारतीय टकारी समाज संघाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी टकारी समाजाचे 63 गरजूं लाभार्थ्यांना शोधून त्यांचे फॉर्म भरून शिबिरे घेऊन जातीचे दाखले मोफत वाटप करून घेतल्याबद्दल शिंदे साहेबांनी अध्यक्ष ॲड. अविनाश गायकवाड व त्यांच्या संपूर्ण टीमचे कौतुक केले व अशाच योजना तळागाळातील गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासनाच्या वतीने भविष्य काळात पडेल ते सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. यावेळी लाभार्थ्यांसह असंख्य समाज बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय जाधव सर यांनी तर अध्यक्षीय भाषण ॲड. अविनाश गायकवाड यांनी केले तर सूत्रसंचालन सुरेंद्र गायकवाड सर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *