तैनुर शफिर शेख यांना राज्यस्तरीय उत्कृष्ठ पत्रकारिता पुरस्कार प्रदान

पुणे, 24 जून: (विश्वजीत खाटमोडे) सा.वतन की लकीर वृत्तपत्राचे संपादक तैनुर शफिर शेख यांना राज्यस्तरीय उत्कृष्ठ पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्‍या सूर्योदय प्रतिष्ठानच्या वतीने प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम पुणे भाजपा कामगार जिल्हा उपाध्यक्ष किशोर अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील कोंढवा बुद्रुक येथील श्री छत्रपती प्राथमिक माध्यमिक विद्यालय व बालक मंदिर याठिकाणी पार पडला.



याप्रसंगी सूर्योदय प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा प्रतिभाताई पाटील, यशदाचे माध्यम व प्रकाशन केंद्र विभाग प्रमुख डॉ. बबन जोगदंड, पद्मावती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विजय दगडे, माजी नगरसेविका संगीता ठोसर, भारती पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस.पाटील, आमदार योगेश टीळेकर, कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पिंपरी चिंचवड पुणे खानदेश मराठा मंडळाचे अध्यक्ष गुलाबराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.



या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून कोळी नटसम्राट, कज्ञोळीगीत कार व नृत्यदिग्दर्शक राजेश खर्डे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन खटावकर यांनी केले तर पत्रकार नरेश टाटिया यांनी आभार मानले. यावेळी डॉ. बबन जोगदंड आणि किशोर अहिरे यांनी सूर्योदय प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा प्रतिभाताई पाटील यांच्या कामाचे कौतुक केले. तसेच त्यांनी पुरस्कार मिळालेल्यांचे आभार मानले. यावेळी विविध स्तरातील मान्यवर, सूर्योदय प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *