विशाखापट्टणम, 23 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) आयसीसी विश्वचषक स्पर्धेनंतर आजपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची टी-20 सामन्यांची मालिका खेळविण्यात येणार आहे. ही मालिका भारतातच होणार आहे. दरम्यान आयसीसी विश्वचषक स्पर्धा नुकतीच पार पडली आहे. त्यामुळे या टी-20 मालिकेसाठी दोन्ही संघातील प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे भारताच्या युवा खेळाडूंना या मालिकेत चांगली कामगिरी करण्याची संधी आहे.
एसटीच्या नवीन बसेस घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांची मंजुरी
तत्पूर्वी, या मालिकेसाठी सूर्यकुमार यादव याला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार करण्यात आले आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व मॅथ्यू वेड याच्याकडे सोपविण्यात आले आहे. या मालिकेतील पहिला सामना आज विशाखापट्टणम येथील वायएस राजशेखर रेड्डी क्रिकेट स्टेडियम खेळविण्यात येणार असून तो सायंकाळी 7 वाजता सुरू होईल. दरम्यान, या मालिकेसाठी भारताच्या प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामूळे या खेळाडूंच्या गैरहजेरीत भारताचे युवा खेळाडू कशी कामगिरी करतात? याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, या मालिकेतील दुसरा टी-20 सामना 26 नोव्हेंबर रोजी तिरुवनंतपुरम येथे, तिसरा सामना 28 नोव्हेंबर रोजी गुवाहाटी येथे, चौथा सामना 1 डिसेंबर रोजी रायपूर येथे तर पाचवा आणि शेवटचा टी-20 सामना 3 डिसेंबर रोजी बेंगळुरू येथे होणार आहे. या सामन्यांचे वेळापत्रक बीसीसीआयने यापूर्वीच जाहीर केले आहे.
फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न
या मालिकेसाठी निवड झालेले खेळाडू:- सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, ईशान किशन (विकेटकीपर), यशस्वी जैस्वाल, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, आवेश खान आणि मुकेश कुमार. तर श्रेयस अय्यर हा रायपूर आणि बेंगळुरू येथे खेळविण्यात येणाऱ्या शेवटच्या दोन T20 सामन्यांसाठी उपकर्णधार म्हणून संघात सामील होईल, अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे.
One Comment on “भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आजपासून टी-20 मालिका”