टी-20 विश्वचषक स्पर्धा; इंग्लंडने अवघ्या 19 चेंडूत सामना जिंकला

अँटिग्वा, 14 जून: (विश्वजीत खाटमोडे) आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत आज इंग्लंड विरुद्ध ओमान यांच्यात सामना झाला. या सामन्यात इंग्लंडने ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. अँटिग्वा येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात इंग्लंडने ओमानचा केवळ 19 चेंडूत पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ओमान संघाने इंग्लंडसमोर 48 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात इंग्लंड संघाने अवघा 3.2 षटकांत 50 धावा करून ऐतिहासिक विजय मिळवला. त्याचबरोबर इंग्लंडने आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत 101 चेंडू राखून विजय मिळवण्याचा नवा विक्रम केला आहे. यापूर्वी हा विक्रम श्रीलंकेच्या नावावर होता. त्यावेळी 2014 मध्ये श्रीलंकेने 90 चेंडू शिल्लक राखून नेदरलँड्स चा पराभव केला होता.

https://twitter.com/ICC/status/1801360018266042676?s=19

https://twitter.com/ICC/status/1801348831528788264?s=19

ओमानचा 47 धावांत ऑलआउट!

आजच्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या ओमान संघाचा डाव 13.2 षटकांत 47 धावांवर संपुष्टात आला. या सामन्यात इंग्लंडच्या भेदक गोलंदाजी समोर ओमानच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही. त्यावेळी ओमान संघाकडून शोएब खान याने सर्वाधिक 11 धावा केल्या. तर त्यांच्या इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्या देखील करता आली नाही. या सामन्यात इंग्लंडकडून आदिल रशिद याने 4 षटकांत 11 धावा देऊन सर्वधिक 4 विकेट घेतल्या. याच कामगिरीमुळे त्याला यावेळी प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला. तसेच यावेळी जोफ्रा आर्चर आणि मार्क वूड यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या.

https://twitter.com/ICC/status/1801360718622581167?s=19

फिल सॉल्टचा विश्वविक्रम

या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा सलामीवीर फिल सॉल्ट याने पहिल्या दोन चेंडूवर षटकार ठोकले. त्यानंतर तो तिसऱ्या चेंडूवर बाद झाला. दरम्यान, या सामन्यात फिल सॉल्टने एक विक्रम स्वतःच्या नावावर केला आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात संघाच्या डावातील पहिल्या 2 चेंडूंवर सलग 2 षटकार मारणारा फिल सॉल्ट हा पहिलाच खेळाडू ठरला आहे. तो बाद झाल्यानंतर विल जॅक ही 5 धावा करून बाद झाला. त्यानंतर कर्णधार जोस बटलरने 8 चेंडूत 24 धावा आणि जॉनी बेअरस्टोने 2 चेंडूत 8 धावा करून हा सामना 8 गडी राखून जिंकला.

इंग्लंड सुपर 8 च्या शर्यतीत कायम

दरम्यान, या टी-20 विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडचा पहिला स्कॉटलंड विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 36 धावांनी पराभव केला होता. त्यामुळे सुपर 8 मध्ये जाण्यासाठी इंग्लंडला आजच्या सामन्यात मोठा विजय मिळवणे आवश्यक होते. त्यानुसार त्यांनी हा सामना 3.1 षटकांत जिंकला. तर इंग्लंड खेळत असलेल्या ग्रुप बी मध्ये ऑस्ट्रेलिया 6 गुण मिळवून पहिल्या क्रमांकावर आहे. स्कॉटलंड 5 गुण मिळवून दुसऱ्या क्रमांकावर, इंग्लंड 3 गुण मिळवून तिसऱ्या, तसेच नामिबिया आणि ओमान अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. आजच्या विजयामुळे गुणतालिकेत इंग्लंडचे 3 गुण झाले आहेत. तसेच इंग्लंडचा नेट रन रेट आता स्कॉटलंड पेक्षा चांगला झाला आहे. दरम्यान, ग्रुप बी मधील ऑस्ट्रेलिया संघ सुपर 8 फेरीसाठी क्वालिफाय झाला आहे. तर सुपर 8 च्या शर्यतीत असलेले इंग्लंड आणि स्कॉटलंड यांचा प्रत्येकी एक चांगला शिल्लक राहिला आहे. त्यातील इंग्लंडचा सामना नामेबिया सोबत होणार आहे. तर स्कॉटलंडचा सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. या सामन्यात दोन्ही संघांना विजय मिळवणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *