सोलापूर, 24 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकला भेट दिली. यावेळी त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. याप्रसंगी बोलताना सुशीलकुमार शिंदे यांनी राजकारणातून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले.
बीएमडब्ल्यू कारमधून लाखोंची चोरी, घटना सीसीटीव्हीत कैद
“मी राजकारणातून निवृत्ती घेत आहे. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे या काँग्रेसच्या उमेदवार असणार आहेत. तरी या लोकसभा निवडणुकीत मला जी काही मदत करता येईल, ती करणार आहे,” अशी माहिती शिंदे यांनी यावेळी दिली. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार कोण असेल? हे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र, याविषयी काँग्रेस पक्षाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. तरी याबाबत काँग्रेस पक्ष कोणता निर्णय घेणार? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
माजी क्रिकेटपटू बिशन सिंग बेदी यांचे निधन
तत्पूर्वी, सुशीलकुमार शिंदे यांचा 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. या निवडणुकीत भाजप नेते डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी पराभव केला होता. त्यावेळी वंचितचे प्रकाश आंबेडकर देखील त्यांच्या विरोधात उभे होते. त्यामुळे या निवडणुकीत शिंदेंना विजय मिळवता आला नव्हता. त्यानंतर सुशीकुमार शिंदे यांनी ही आपली अखेरची निवडणूक असल्याचे जाहीर केले होते. दरम्यान, सुशीलकुमार शिंदे हे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी सोलापुरात येत असतात.
2 Comments on “सुशीलकुमार शिंदेंची निवृत्तीची घोषणा, लोकसभेचा उमेदवार जाहीर”