बारामती, 11 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या माध्यमातून बारामती शहरात विविध ठिकाणी सध्या लोकोपयोगी कामे करण्यात येत आहेत. या कामांची पाहणी आरपीआय (आठवले) पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनी केली. यावेळी आरपीआय (आठवले) पक्षाचे पुणे जिल्हा युवक कार्याध्यक्ष रविंद्र (पप्पू) सोनवणे आणि आरपीआय (आठवले) पक्षाचे बारामती शहराध्यक्ष अभिजीत कांबळे यांनी सूर्यकांत वाघमारे यांना या कामांची माहिती दिली.
यावेळी रविंद्र सोनवणे आणि अभिजीत कांबळे यांनी सूर्यकांत वाघमारे यांच्याकडे बारामती शहरातील विशेषतः दलित वस्त्यांमधील विकास कामासाठी निधी मिळावा अशी मागणी केली. तर येणाऱ्या पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सदर प्रश्न उपस्थित करून निधी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वोत्परी प्रयत्न करणार असल्याचे सूर्यकांत वाघमारे यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, पुणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य पदी निवड झाल्यापासून आरपीआय (आठवले) पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांच्याकडून पुणे जिल्ह्यातील विकास कामासाठी विशेषतः दलित वस्त्यांमधील विकास कामाकरीता निधी उपलब्ध करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बारामती शहरात पक्षाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या लोकोपयोगी कामांची माहिती सूर्यकांत वाघमारे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून घेतली.
त्यानंतर आरपीआय (आठवले) पक्षाच्या बारामती शहर आणि तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक गेस्ट हाऊस याठिकाणी पार पडली. या बैठकीला आरपीआय (आठवले) चे पश्चिम महाराष्ट्र सचिव सुनील शिंदे, पश्चिम महाराष्ट्र महिला उपाध्यक्षा रत्नप्रभा साबळे, पुणे जिल्हा युवती अध्यक्षा सुप्रियाताई वाघमारे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर मोरे, पुणे जिल्हा युवक कार्याध्यक्ष रविंद्र (पप्पू) सोनवणे, बारामती तालुका अध्यक्ष संजय वाघमारे, बारामती तालुका महिला अध्यक्षा सिमा चोपडे, बारामती तालुका सरचिटणीस माऊली कांबळे, बारामती महिला कार्याध्यक्षा पूनमताई घाडगे, बारामती शहराध्यक्ष अभिजीत कांबळे, मोईन बागवान, अक्षय गायकवाड, महंमद शेख, शेखर लोंढे, गणेश जाधव आदी सामाजिक कार्यकर्ते तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षातील बारामती शहर आणि तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.