पुणे, 13 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) पुणे जिल्हा नियोजन समितीवर निवड झाली आहे. सूर्यकांत वाघमारे यांची 25 वर्षांपेक्षा अधिक राजकीय कारकीर्द आहे. या काळात त्यांनी अनेक सामाजिक कार्यात सहभाग घेतला. तसेच त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी आजवर अनेक आंदोलने केली आहेत. सूर्यकांत वाघमारे यांनी आजवर पक्ष संघटना वाढवण्यावर भर दिला आहे. त्यांची आता पुणे जिल्हा नियोजन समितीवर निवड झाल्यामुळे रिपब्लिकन पार्टीला फायदाच होणार आहे.
सूर्यकांत वाघमारे यांची रिपब्लिकन पार्टीचे धडाडीचे नेते म्हणून ओळख आहे. सूर्यकांत वाघमारे हे त्यांच्या सामजिक कार्यामुळे कायम चर्चेत असतात. त्यांनी आजवर अनेक प्रकारची आंदोलने केली आहेत. या आंदोलनामुळे त्यांनी सर्वसामान्य जनतेचे अनेक प्रश्न आणि समस्या मार्गी लावल्या आहेत. तसेच त्यांचा कार्यकर्त्यांशी देखील चांगला संपर्क आहे. सुर्यकांत वाघमारे यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत पक्ष वाढवण्यावर भर दिला आहे.
रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष असताना त्यांनी पक्षाच्या हिताचे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत. त्यांच्या या कार्यामुळे सूर्यकांत वाघमारे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पुणे जिल्हा नियोजन समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची निवड रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशाने झाली आहे. सूर्यकांत वाघमारे यांच्या निवडीमुळे त्यांचे कार्यकर्ते सध्या त्यांचे अभिनंदन करताना दिसत आहेत.