शहाजीबापू पाटील यांच्यावर शस्त्रक्रिया; मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयात जाऊन घेतली भेट

मुंबई, 03 जून: (विश्वजीत खाटमोडे) सांगोला विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर सध्या मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ब्रीच कॅण्डी रुग्णालयात जाऊन शहाजीबापू पाटील यांची भेट घेतली. तसेच त्यांनी यावेळी शहाजीबापूंच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.

https://twitter.com/mieknathshinde/status/1797489069158760955?s=19

मुख्यमंत्र्यांकडून तब्येतीची विचारपूस

तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहाजीबापू पाटील यांच्या प्रकृतीविषयी रुग्णालयातील डॉक्टरांकडून माहिती घेतली. सोबतच त्यांनी यावेळी शहाजीबापूंच्या कुटुंबीयांशी देखील चर्चा केली. शहाजीबापू पाटील यांची प्रकृती स्थिर असून लवकरात लवकर त्यांनी पूर्णपणे बरे होऊन पुन्हा एकदा जनसेवेसाठी कार्यरत व्हावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली. याप्रसंगी, शहाजीबापू पाटील यांचे कुटुंबीय आणि सहकारी तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे उपस्थित होते.

काय झाडी, काय डोंगर…

दरम्यान, दोन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठे बंड केले. त्यांच्या बंडाला शिवसेनेतील 40 आमदारांनी दिला होता. यामध्ये सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी देखील एकनाथ शिंदे यांना साथ दिली होती. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी त्यांचे आमदार गुवाहाटीला नेल्यानंतर शहाजीबापू पाटील यांचे एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाले होते. त्यामधील शहाजीबापूंचा ‘काय झाडी… काय डोंगर… काय हॉटेल…’ हा डायलॉग चांगलाच गाजला. तेंव्हा शहाजीबापू पाटील चर्चेत आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *