नांदेड, 11 नोव्हेंबरः राष्ट्रीय काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात देशात सुरु असलेल्या भारत जोडो यात्रा ही महाराष्ट्रात दाखल झाली आहे. ही भारत जोडो यात्रा गुरुवारी, 10 नोव्हेंबर 2022 रोजी नांदेड येथे आली. यावेळी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे या देखील सहभागी झाल्या होत्या.
कृषि विभागाकडून रब्बी पिकांच्या प्रात्यक्षिकांचे नियोजन
या भारत जोडो यात्रेत खासदार सुप्रिया सुळे ह्या राहुल गांधी यांच्या समवेत चालल्या. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यासह पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भवानीनगर कारखान्याच्या वाहतुकीवर दंडात्मक कारवाई
भारत यात्रेसंदर्भात सुप्रिया सुळे यांनी ट्वीट केलं आहे. ‘राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल जी गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेमध्ये नांदेड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सहभागी झाले.यावेळी प्रदेशाध्यक्ष मा. जयंतराव पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.’ असे त्यांनी या ट्वीटमध्ये लिहिले आहे.
राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल जी गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या 'भारत जोडो' यात्रेमध्ये नांदेड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सहभागी झाले.यावेळी प्रदेशाध्यक्ष मा. जयंतराव पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. pic.twitter.com/byVW1KOdOh
— Supriya Sule (@supriya_sule) November 10, 2022
यात्रेत सहभाग घेतल्याबद्दल काँग्रेसकडूनही ट्वीट करत खासदार सुप्रिया सुळे यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहे.
यह भारतीय राजनीति का एक सुखद पल है – दलों से ऊपर देश है – और उसको जोड़ने के लिए हम सब एक हैं! आज यात्रा में कदम मिलाने के लिए आपका साधुवाद @supriya_sule जी#BharatJodoYatra pic.twitter.com/H3UagoOGOh
— Congress (@INCIndia) November 10, 2022
One Comment on “भारत जोडो यात्रेत सुप्रिया सुळेंचा सहभाग”