बारामती, 19 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) सुप्रिया सुळे यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी बारामती मतदार संघातून काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी आज बारामती तालुक्यातील कन्हेरी गावातून प्रचाराचा शुभारंभ केला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते कन्हेरी येथील मारूती मंदिरात नारळ वाढवून सुप्रिया सुळे यांच्या निवडणुकीच्या प्रचाराची सुरूवात करण्यात आली. याप्रसंगी आमदार संजय जगताप, आमदार रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, सतीश खोमणे, राजेंद्र पवार, श्रीनिवास पवार, बारामती तालुकाध्यक्ष एस. एन. बापू, संदीप गुजर, वनिता बनकर, यांच्यासह पवार कुटुंबीय, स्थानिक ग्रामस्थ, पक्षाचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.
बारामती तालुक्यातील कण्हेरी येथील मारुती मंदिरात आदरणीय पवार साहेबांच्या हस्ते नारळ वाढवून आजपासून प्रचाराची सुरुवात करण्यात आली. साहेब आपल्या पहिल्या निवडणूकीपासून याच मंदिरात नारळ फोडून प्रचाराची सुरुवात करतात. गेली अनेक निवडणूका हा शिरस्ता कायम आहे. यावेळी पुरंदर हवेलीचे आमदार… pic.twitter.com/oxxdiYgR4L
— Supriya Sule (@supriya_sule) April 19, 2024
ही लोकसभा निवडणूक शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठी महत्वाची आहे. आगामी काळात सेवा सन्मान आणि स्वाभिमान या त्रिसुत्रीवर आपण काम करणार आहोत. मी माझा ‘काल’ बदलू शकत नाही मी माझा ‘उद्या’ नक्की बदलू शकते. एवढी ताकत माझ्यात आहे. आपल्याला मिळालेले ‘तुतारी फुंकणारा माणूस’ हे चिन्ह शुभसंकेत…
— Supriya Sule (@supriya_sule) April 19, 2024
सुप्रिया सुळेंचे मतदारांना आवाहन
“ही लोकसभा निवडणूक शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठी महत्वाची आहे. आगामी काळात सेवा सन्मान आणि स्वाभिमान या त्रिसुत्रीवर आपण काम करणार आहोत. मी माझा काल बदलू शकत नाही, मी माझा उद्या नक्की बदलू शकते. एवढी ताकत माझ्यात आहे. आपल्याला मिळालेले ‘तुतारी फुंकणारा माणूस’ हे चिन्ह शुभसंकेत आहेत. कारण शुभकार्यात तुतारी वाजवली आहे. त्यामुळे येत्या 7 मेला मतदान करून मला पुन्हा एकदा आशिर्वाद द्यावा,” असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी कन्हेरी ग्रामस्थांना केले.
बारामती लोकसभा मतदारसंघातील कन्हेरी येथे आयोजित सभेत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) April 19, 2024
व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व नेते, आमचे उमेदवार आणि गेल्या अनेक वर्षांची जी आपली प्रथा आहे की निवडणुकीची सुरुवात आपण कन्हेरीत करतो. हे ठिकाण श्रद्धेचे ठिकाण आहे, अनेकांनी या ठिकाणी सेवा केली.… pic.twitter.com/vKNknCMvC7
शरद पवार काय म्हणाले?
दरम्यान, पवार कुटुंबीय त्यांच्या निवडणुकीच्या प्रचाराची सुरूवात कन्हेरीच्या मारूती मंदिरात नारळ फोडून करतात. शरद पवार यांच्या 1967 मधील पहिल्या निवडणूकीत देखील कन्हेरी गावातील मारूती मंदिरात नारळ फोडून प्रचाराची सुरूवात करण्यात आली होती. तेंव्हापासून आजपर्यंत ही परंपरा कायम आहे. यावेळी शरद पवार यांनी सभेत बोलताना म्हटले की, “गेल्या अनेक वर्षांची जी आपली प्रथा आहे की, निवडणुकीची सुरूवात आपण कन्हेरीत करतो. हे ठिकाण श्रद्धेचे ठिकाण आहे, अनेकांनी या ठिकाणी सेवा केली.”
57 वर्षांची परंपरा कायम
1967 साली पहिल्यांदा, 1971 साली निवडणूक झाली तेव्हा, 1980, 1985, 1990, 1995, 2000 आत्तापर्यंत इतक्यांदा कन्हेरीत आलो. मला नाही वाटत, नारळ फोडायला एखादा माणूस एखाद्या ठिकाणी इतक्या वेळेला गेला असेल. हे जे मी करू शकलो ती सामान्य जनता आणि हनुमंताची कृपा! त्यामुळे इथून कामाची सुरूवात केल्यानंतर यश हे मिळतच हा अनेक वर्षांचा अनुभव असल्याचे शरद पवार यावेळी म्हणाले.