सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणावरील क्युरेटिव्ह पिटीशन याचिका स्वीकारली

दिल्ली, 23 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) मराठा समाजासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मराठा आरक्षण संदर्भात महाराष्ट्र राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटीशन याचिका दाखल केली होती. ही याचिका सुप्रीम कोर्टाने स्वीकारली आहे. त्यानुसार या याचिकेवर आता 24 जानेवारी 2024 रोजी सुनावणी होणार आहे. तर काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने दाखल केलेल्या क्युरेटिव्ह पिटीशनवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली होती. तेंव्हापासून कोर्टाने या याचिकेवर कोणताच निर्णय दिला नव्हता. मात्र आज सुप्रीम कोर्टाने क्युरेटिव्ह पिटीशन याचिका स्वीकारत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने याबाबत केलेल्या प्रयत्नांना मिळालेले हे यश आहे.



दरम्यान, मे 2021 रोजी सुप्रीम कोर्टाच्या 5 सदस्यीय खंडपीठाने दिलेल्या निर्णयामुळे मराठा आरक्षण रद्द झाले होते. त्यावेळी कोर्टाने मराठा समाजाला आरक्षण देता येणे शक्य नसल्याचे म्हटले होते. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या या निर्णयाचा फेरविचार करावा, यासाठी राज्य सरकारने 13 ऑक्टोंबर रोजी सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटीशन दाखल केली होती. राज्य सरकारने 2018 साली एसईबीसी कायद्यांतर्गत मराठा समाजाला आरक्षण दिले होते. पण ते आरक्षण मे 2021 मध्ये सुप्रीम कोर्टाने रद्द केले होते. त्यावेळी मराठा समाज सामाजिक, शैक्षणिक, आर्थिकदृष्ट्या मागास असल्याचे सिद्ध होऊ न शकल्यामुळे सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाचे आरक्षण रद्द केले होते.

https://twitter.com/vnpatilofficial/status/1738501359643906387?s=19

मात्र आता सुप्रीम कोर्टाने क्युरेटिव्ह पिटीशन स्वीकारल्यामुळे मराठा आरक्षणासाठी ही सकारात्मक गोष्ट आहे. यासंदर्भात मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे. “माननीय सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांनी मराठा आरक्षणा संदर्भात क्युरेटिव्ह पिटीशन स्वीकारलेली आहे येत्या 24 जानेवारीला या संदर्भात निकाल देण्यात येईल, असे आज न्यायालयाने स्पष्ट केले बारा वाजून तेवीस मिनिटाला याबाबत मान्य न्यायमूर्तींनी सही करून त्या संदर्भात आदेश दिलेला आहे. मला विश्वास आहे की, मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकणार,” असे विनोद पाटील यामध्ये म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *