संचालक मंडळ निवडणुकीत दडपशाही!

बारामती, 28 एप्रिलः बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी आज, 28 एप्रिल 2023 रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मात्र बारामती तालुक्यातील पणदरे आणि सांगवी येथील मतदान केंद्रांवर प्रशासनाचा गाफिल कारभार पहायला मिळाला.

बारामती शहरासह परिसरातील लॉजची पोलिसांकडून चेकिंग

पणदारे येथील नव महाराष्ट्र विद्यालय आणि सांगवी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे मोठ्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते हे मतदान केंद्रावर सर्रासपणे वावरताना दिसताहेत. यामुळे मतदान करण्यासाठी आलेले मतदार हे दडपणाखाली असल्याची प्रतिक्रिया ग्रामपंचायत सदस्य मतदार संघातील अपक्ष उमेदवार अभिजीत कांबळे यांनी ‘भारतीय नायक’शी बोलताना दिली आहे. तसेच तालुक्यातील इतर ठिकाणी परिस्थिती अशीच असल्याचे त्यांनी सांगितले.

तहसिल कार्यालयातील इंटरनेटमुळे सर्वसामान्यांचे हाल

या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती बारामती कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक निबंधक यांनी दिल्याचे अभिजीत कांबळे यांनी सांगितले.

2 Comments on “संचालक मंडळ निवडणुकीत दडपशाही!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *