सुनेत्रा पवार यांचा राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल

मुंबई, 13 जून: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी आज राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तत्पूर्वी, देशात नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात सुनेत्रा पवार यांचा सुप्रिया सुळे यांनी 1 लाख 58 हजार 333 मतांनी पराभव केला होता. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षाकडून आता सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेची उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

https://twitter.com/ANI/status/1801170688167870502?s=19

https://twitter.com/ANI/status/1801153984620535919?s=19

सुनेत्रा पवार यांचा अर्ज

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार आज मुंबईतील विधानभवनात पोहोचल्या. यावेळी त्यांनी राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ उपस्थित होते. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त जागेसाठी 25 जून रोजी राज्यसभेची पोटनिवडणूक होणार आहे. या रिक्त जागेवर सुनेत्रा पवार यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे बारामती मतदारसंघाला आता सुप्रिया सुळे, शरद पवार आणि सुनेत्रा पवार असे तीन खासदार मिळणार आहेत.

https://twitter.com/ANI/status/1801155673557803301?s=19

छगन भुजबळ यांचे स्पष्टीकरण

दरम्यान, सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी दिल्यामुळे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा होती. परंतु, छगन भुजबळ यांनी आपण अजिबात नाराज नसल्याचे म्हटले आहे. पक्षाच्या कोअर ग्रुपच्या सदस्यांनी एकमताने सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्यासह अनेकांना ती जागा हवी होती, पण चर्चेनंतर आम्ही सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मी अजिबात नाराज नाही. आम्ही हा निर्णय पक्षासाठी घेतला आहे, असे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *