बीड, 21 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पुतण्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सचिन मेटे (34) असे त्याचे नाव आहे. विनायक मेटे यांच्या राहत्या गावी ही धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे मेटे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर पसरला आहे. त्याने स्वतःला गळफास लावून घेत आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
मुदतीत कर भरलेल्या नागरिकांना बक्षिसांचे वितरण
या घटनेची माहिती मिळताच बीड पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला आहे. तर ही आत्महत्या आहे की घातपात? त्यादृष्टीने बीड पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. दरम्यान, सचिनने मानसिक तणावाखाली येऊन आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. सचिन हा विनायक मेटे यांचे बंधू त्रिंबक मेटे यांचा मुलगा होता.
राज्यातील सीईटी परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध
तत्पूर्वी, विनायक मेटे यांचे गेल्याच वर्षी कार अपघातात दुःखद निधन झाले होते. त्यांच्या निधनाला 2 महिन्यांपूर्वीच एक वर्ष पूर्ण झाले होते. अशातच सचिन मेटे यांनी आत्महत्या केल्यामुळे मेटे कुटुंबाला आणखी एक जबर धक्का बसला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
One Comment on “विनायक मेटेंच्या पुतण्याची आत्महत्या”