पुणे जिल्ह्यातील 21 जागांवर अशी लढत होणार! पहा संपूर्ण यादी

पुणे, 17 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्रातील विधानसभेच्या 288 जागांसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. या मतदानाचा निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर करण्यात येणार आहे. या निवडणुकीत बहुतांश जागांवर महाविकास आघाडी विरूद्ध महायुती अशी थेट लढत असणार आहे. तर काही जागांवर बंडखोरी झाल्यामुळे तिरंगी-चौरंगी लढत पहायला मिळणार आहे. त्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यात विधानसभेचे 21 मतदारसंघ आहेत. जिल्ह्यातील या सर्व लढतींकडे देखील सर्वांचे लक्ष असणार आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील अनेक जागांवर अटीतटीचा सामना होण्याचा अंदाज आहे. या निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील कोणत्या मतदारसंघात कशी लढत होणार? याची माहिती आपण पुढे पाहणार आहोत.



1) जुन्नर विधानसभा मतदारसंघ
जुन्नर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अतुल बेनके आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सत्यशील शेरकर, अपक्ष उमेदवार आशा बुचके आणि अपक्ष उमेदवार शरद सोनवणे यांच्यात लढत होणार आहे.
2) आंबेगाव विधानसभा मतदारसंघ
आंबेगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे देवदत्त निकम यांच्यात थेट लढत आहे.
3) खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ
खेड आळंदी मतदारसंघात राष्ट्रवादीचे दिलीप मोहिते पाटील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बाबाजी काळे यांच्यात सामना आहे.
4) शिरूर विधानसभा मतदारसंघ
शिरूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अशोक पवार विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्ञानेश्वर कटके असा सामना रंगणार आहे.



5) दौंड विधानसभा मतदारसंघ
दौंड विधानसभा मतदारसंघात भाजपचे राहुल कुल आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे रमेश थोरात यांच्यात थेट लढत आहे.
6) इंदापूर विधानसभा मतदारसंघ
इंदापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे हर्षवर्धन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रय भरणे आणि अपक्ष उमेदवार प्रविण माने यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.
7) बारामती विधानसभा मतदारसंघ
बारामती विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे युगेंद्र पवार यांच्यात थेट लढत आहे.
8) पुरंदर विधानसभा मतदारसंघ
पुरंदर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे विजय शिवतारे, काँग्रेसचे संजय भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संभाजी झेंडे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. दरम्यान, या निवडणुकीत पुरंदरमध्ये महायुतीतील मित्रपक्ष एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत.
9) भोर विधानसभा मतदारसंघ
भोर मतदारसंघात काँग्रेसचे संग्राम थोपटे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शंकर मांडेकर, अपक्ष उमेदवार किरण दगडे पाटील आणि अपक्ष उमेदवार कुलदीप कोंडे यांच्यात सामना रंगणार आहे.
10) मावळ विधानसभा मतदारसंघ
मावळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सुनील शेळक विरूद्ध अपक्ष उमेदवार अण्णा उर्फ बापू भेगडे यांच्यात थेट लढत आहे.
11) चिंचवड विधानसभा मतदारसंघ
चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपचे शंकर जगताप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राहुल कलाटे अशी लढत आहे.
12) पिंपरी विधानसभा मतदारसंघ
पिंपरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अण्णा बनसोडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या सुलक्षणा शिलवंत यांच्यात लढत होणार आहे.
13) भोसरी विधानसभा मतदारसंघ
भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे महेश लांडगे विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अजित गव्हाणे यांच्यात थेट लढत आहे.
14) वडगाव शेरी मतदारसंघ
वडगाव शेरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सुनील टिंगरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे बापूसाहेब पठारे यांच्यात थेट लढत आहे.
15) शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ
शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात भाजपचे सिद्धार्थ शिरोळे, काँग्रेस पक्षाचे दत्ता बहिरट आणि अपक्ष उमेदवार मनीष आनंद अशी तिरंगी लढत होणार आहे.
16) कोथरूड विधानसभा मतदारसंघ
कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजपचे चंद्रकांत पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चंद्रकांत मोकाटे आणि मनसेचे किशोर शिंदे अशी तिरंगी लढत आहे.
17) खडकवासला विधानसभा मतदारसंघ
खडकवासला विधानसभा मतदारसंघात भाजपचे भीमराव तापकीर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सचिन दोडके आणि मनसेचे मयुरेश वांजळे अशी लढत आहे.
18) पर्वती विधानसभा मतदारसंघ
पर्वती विधानसभा मतदारसंघात भाजपच्या माधुरी मिसाळ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या अश्विनी कदम, अपक्ष उमेदवार आबा बागुल आणि अपक्ष उमेदवार सचिन तावरे यांच्यात लढत होणार आहे.
19) हडपसर विधानसभा मतदारसंघ
हडपसर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चेतन तुपे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रशांत जगताप आणि मनसेचे साईनाथ बाबर यांच्यात लढत आहे.
20) पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ
पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात भाजपचे सुनील कांबळे आणि काँग्रेसचे रमेश बागवे यांच्यात थेट लढत आहे.
21) कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ
कसबा पेठ मतदारसंघात काँग्रेसचे रविंद्र धंगेकर आणि भाजपचे हेमंत रासने यांच्यात सामना रंगणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *