ठाणे/ बारामती, 17 मार्चः (प्रतिनिधी- शरद भगत) ठाणे येथे नुकताच 12 मार्च 2023 रोजी 27व्या राष्ट्रीय वेपन्स लाठीकाठी स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत बारामती तालुक्यातील सुपे गावाजवळील खंडू खैरेवाडी येथील राजे प्रतिष्ठान न्यू इंग्लिश स्कूलने घवघवीत यश संपादन केले आहे. या स्पर्धेत राजे प्रतिष्ठान न्यू इंग्लिश स्कूलमधील इयत्ता तिसरीतील विद्यार्थिनी श्रावणी राहुल यादव हिने प्रथम क्रमांक पटकविला. तर शिवशंभू मर्दानी कला आणि क्रीडा प्रशिक्षण संस्था कारखेल, बारामती येथील शिवराज शिवाजी यादव यांने प्रथम क्रमांक पटकविला. तसेच न्यू इंग्लिश स्कूलचे क्रीडा प्रशिक्षक राहुल यादव सर यांना राष्ट्रीय उत्कृष्ट प्रशिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
सदर स्पर्धेत यश संपादित केल्याबद्दल यशस्वी खेळाडू विद्यार्थी- विद्यार्थिनींसह क्रीडा प्रशिक्षक राहुल यादव सर यांचा संस्थेचे संस्थापक दिलीप खैरे, स्कूलच्या मुख्याध्यापिका मनिषा खैरे यासह सहकारी शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.
One Comment on “राष्ट्रीय वेपन्स लाठीकाठी स्पर्धेत राजे प्रतिष्ठान न्यू इंग्लिश स्कूलचे यश”