बारामती, 22 नोव्हेंबरः बारामती नगरपरिषदेसमोर भारतीय युवा पँथर संघटनेचे 15 नोव्हेंबर 2022 पासून धरणे आंदोलन सुरू होते. त्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. बारामती शहरातील भारतरत्न प.पू.डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी हायड्रॉलिक शिडी बसविण्याच्या मागणीचे निवेदन संघटनेचे बारामती शहराध्यक्ष निखिल खरात यांनी बानपचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांना दिले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना भीम अनुयायी अभिवादन करण्यासाठी आल्यानंतर पुष्पहार अर्पण करण्यासाठी शिडीची गरज आहे. तसेच स्मारकाची स्वच्छता करताना देखील शिडी/ हायड्रॉलिकची गरज आहे. याबाबत 14 नोव्हेंबर 2022 रोजी निवेदन दिले होते.
रासपकडून फेरविचार याचिका दाखल करण्याची मागणी
सदर निवेदनावर कोणतीही कारवाई झाली नसल्याने सोमवारी 21 नोव्हेंबर 2022 रोजी बानपसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते. बारामती नगर परिषद मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी लेखी पत्र देऊन दोन महिन्यात हायड्रॉलिक शिडीचे काम करू, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित केले.
यावेळी भारतीय युवा पँथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शुभम गायकवाड, पुणे जिल्हा उपाध्यक्ष अस्लम वस्ताद शेख, बारामती शहराध्यक्ष निखिल खरात, संघटनेचे सदस्य विराज औदुते, समीर खान, किशोर मोरे, सेवक अहिवळे, सुलतान ग्रुप संस्थापक अध्यक्ष हसन शेख, इम्रान पठाण, हेमंत कांबळे, योगेश महाडिक, प्रतिक चव्हाण आणि पदाधिकारी उपस्थित होते.
बारामतीचा पाणीपुरवठा राहणार बंद!
One Comment on “भारतीय युवा पँथरच्या धरणे आंदोलनाला यश”