बारामती, 04 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) बारामती शहरातील आमराईतील झोपडपट्टी परिसरात विद्युत खांब बसविण्यात आले आहेत. बारामती शहरातील आमराईतील झोपडपट्टी परिसरात अंतर्गत ठिकाणी विद्युत खांब बसविण्यात यावेत, यासाठी आरपीआय (आठवले) चे पुणे जिल्हा युवक कार्याध्यक्ष रविंद्र(पप्पू) सोनवणे यांच्या मार्फत बारामती नगरपरिषदेला वारंवार लेखी निवेदने देण्यात आली होती. तसेच यासाठी आंदोलन देखील करण्यात आले होते. त्याची दखल घेऊन दि.1 डिसेंबर 2023 रोजी बारामतीच्या आमराईमधील प्रबुद्धनगर येथील झोपडपट्टी परिसरात अंतर्गत ठिकाणी सुरूवातीचा भाग म्हणून एक विद्युत खांब बसविण्यात आला होता.
https://youtu.be/UTd2TQ40Ats?si=R3w2lFEQ41TCqs1v
https://youtu.be/lfxfGiyv_VE?si=3uddwOs1ypfxc3dW
नगरपरिषदेचे मानले आभार
त्यानंतर आता बारामती शहरातील बस स्टँड समोरील दादासोनगर येथील झोपडपट्टी परिसरात 3 जुलै रोजी आणखी काही विद्युत खांब बसविण्यात आले आहेत. दरम्यान सदर विद्युत खांब बसविल्याबद्दल बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, नगरपरिषदेचे विद्युत विभाग प्रमुख सिद्धार्थ मोरे तसेच कर्मचारी सागर लालबिगे यांचे आरपीआय (आठवले) चे पुणे जिल्हा युवक कार्याध्यक्ष रविंद्र(पप्पू) सोनवणे यांनी आभार मानले आहेत. तसेच बारामती शहर विशेषतः आमराईतील उर्वरित झोपडपट्टी परिसरात अंतर्गत ठिकाणी विद्युत खांब बसविण्यासाठी नगरपरिषदेकडे पाठपुरावा चालू असल्याचे याप्रसंगी रविंद्र(पप्पू) सोनवणे यांनी यावेळी सांगितले.
https://youtu.be/xvuLZkwIQO0?si=lxDJYdzuhlnJvfpz
स्थानिकांनी समाधान व्यक्त केले
शहरातील उपरोक्त ठिकाणी झोपडपट्टी परिसरात विद्युत खांब बसविण्यात आल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केले आहे. तसेच यावेळी स्थानिकांनी रविंद्र(पप्पू) सोनवणे आणि बारामती नगरपरिषदेतील संबंधित अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानले आहेत. याप्रसंगी, आरपीआय (आठवले) च्या पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या उपाध्यक्षा रत्नप्रभा साबळे, बारामती तालुकाध्यक्ष संजय वाघमारे, यासह संतोष पाडळे, मोहन शिंदे, अविनाश कांबळे, शेखर लोंढे, शाहरुख बागवान, साहिल सोनवणे, रोशन खलसे, तुषार काळे, रवि गायकवाड, आर्यन काळे, गणेश सुर्यवंशी, माऊली कांबळे आदी सामाजिक कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक आणि महिला देखील उपस्थित होत्या.