ओढ्यात वाहून गेलेल्या दुचाकीस्वारास वाचविण्यात यश

बारामती, 20 ऑक्टोबरः (प्रतिनिधी- शरद भगत) बारामती तालुक्यातील मोरगाव- मुर्टी रस्त्यावरील जाधव वस्ती येथील होलनकुंड ओढ्यात आज, 20 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी एक दुचाकीस्वार पडून वाहून गेला. सदर घटनेची माहिती मिळताच वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी घटनास्थळी भेट दिली. वाहून गेलेल्या दुचाकीस्वारास सुखरुप वाचविण्यात यश आले आहे.

बारामतीत ओढ्याच्या पाण्यात दुचाकीस्वार गेला वाहून

दरम्यान, मुर्टी गावातीलच युवक दिलीप बालगुडे आणि राजू उर्फ ननू तांबे यांनी त्या युवकास वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. यानंतर वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या नेतृत्वात करंजेपूल पोलीस स्टेशनचे पोलीस इन्स्पेक्टर योगेश शेलार, पोलीस हवालदार अमोल भोसले, देशमाने, साळुंके यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने वाहून गेलेल्या युवकास सुखरुप बाहेर काढण्यात यश आले. तसेच पाण्यातील दुचाकीही बाहेर काढण्यात आली. प्रवाहात वाहून जाणाऱ्या दुचाकीस्वाराचे नाव सागर पाटील असून तो सांगली जिल्ह्यातील असल्याचे सांगितले.

बारामतीत ओढ्याच्या पाण्यात दुचाकीस्वार गेला वाहून

सदर घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी अनिल बागल तसेच राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर हे दाखल झाले.

One Comment on “ओढ्यात वाहून गेलेल्या दुचाकीस्वारास वाचविण्यात यश”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *