बारामती, 24 सप्टेंबरः बारामती येथील बस स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सदरच्या कामामुळे बस स्थानक हे तात्परते कसबा येथे स्थालांतरीत करण्यात आले आहे. यामुळे अनेक प्रवाशांची गैरसोय होताना दिसत आहे. तसेच बस स्थानकाच्या स्थलांतराचा फटका तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही होताना दिसत आहे. प्रास्ताविक बारामतीमधील नवीन बस स्थानकाचे काम पूर्ण होण्यासाठी बराच वेळ जाणार आहे.
परंतु स्थलांतरीत बस स्थानक ते तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयमधील अंतर आता चार ते पाच किलोमीटर झाले आहे. यामुळे दररोज विद्यार्थ्यांना पायी ये- जा करण्याची कसरत करावी लागत आहे. हे अंतर लांब असल्यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास होत आहे. यामुळे स्थलांतरीत बस स्थानक ते तुळजाराम चंतुरचंद महाविद्यालय या दरम्यान बस चालू करण्याकरिता बारामती बस स्थानक आगार प्रमुख अमोल गोंजारी यांना विद्यार्थ्यांकडून नुकतेच निवेदन देण्यात आले.
गोंजारी यांनी विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली. त्यांनी या बाबत सकारात्मक निर्णय घेत लवकरात लवकर बस चालू करण्याचे आश्वासन विद्यार्थ्यांना दिले आहे. निवेदन देते वेळी ए. बी. पाटील, अण्णा पाटील, योगेश गावडे, ओंकार नांगरे, निखिल गावडे, प्रीतम गुळूमकर आदी विद्यार्थी उपस्थित होते.