बारामतीत विद्यार्थी बसचा अपघात; मोठा अनर्थ टळला!

बारामती, 19 जुलैः (प्रतिनिधी- बाळासाहेब बालगुडे) बारामती तालुक्यातील मगरवाडी येथे गुरुवारी (दि.18) रोजी सकाळी 9.40 च्या सुमारास जगताप ट्राव्हल्सची खासगी स्कूल बस (एम एच 12 एच बी 0297) चा अपघात झाला. सदर अपघातामध्ये दोन विद्यार्थी किरकोळ जखमी झालेले असून त्यांना बारामती येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दरम्यान, उपचारानंतर जखमी विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीवरून, सदर स्कूल बस ही लोणी भापकर- वाकी- मगरवाडी मार्गे करंजे गाव येथून सह्याद्री पब्लिक स्कूलच्या दिशेने जात होती. जाताना मगरवाडी जवळ आल्यानंतर स्कूल बस चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला आहे.

स्कूल बसमधून 30 विद्यार्थी प्रवास करत होते. सुदैवाने इतर विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची इजा झाल्याचे वृत्त नाही. रस्त्याला साईट पट्टी व्यवस्थित नाही आणि साईड कडेही नाही, यामुळे अनेकदा सदर रस्त्यावर अनेक अपघात घडत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्त्याच्या साईट पट्टीकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बालगुडे यांनी ‘भारतीय नायक’ शी बोलताना सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *