मुंबई, 22 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) अरबी समुद्रात पुन्हा एकदा चक्री वादळाचे संकट निर्माण झाले आहे. या चक्री वादळाचे नाव ‘तेज’ असे आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या या तेज चक्री वादळाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. या संदर्भात भारतीय हवामान खात्याकडून धोक्याचा इशारा देण्यात आला.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणाची आत्महत्या
तेज चक्री वादळ आज (दि.22) दुपारपूर्वी तीव्र रूप धारण करू शकते, असे हवामान खात्याने म्हटले आहे. याबाबत हवामान विभागाने ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, “तेज चक्रीवादळ 22 ऑक्टोबरच्या दुपारनंतर अत्यंत तीव्र स्वरूप शक्यता आहे. तसेच येत्या 24 तासांत या चक्री वादळाचा धोका आणखी वाढू शकतो. त्यानंतर हे चक्री वादळ 25 ऑक्टोंबरच्या पहाटे येमेन आणि ओमान दरम्यान जाऊ शकते. त्यामुळे चक्रीवादळाचा गुजरातवर कोणताही परिणाम होणार नाही.”
आफ्रिकेचा इंग्लंडवर 229 धावांनी विजय
दरम्यान, तेज चक्री वादळाचा धोका लक्षात घेता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, तटरक्षक दलाने आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू मधील मच्छिमारांना धोक्याचा इशारा दिला आहे. याशिवाय याठिकाणी कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून अनेक जहाजे तैनात करण्यात आली आहेत.
तत्पूर्वी, या वर्षातील अरबी समुद्रातील हे दुसरे चक्री वादळ आहे. याच्याआधी अरबी समुद्रात बिपरजॉय वादळाने गुजरातमधील कच्छ आणि सौराष्ट्रात हाहाकार माजविला होता. त्यामुळे या भागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
One Comment on “तेज चक्रीवादळाचा जोर वाढणार!”