बारामती नगरपरिषदमध्ये अजब कारभार!

अफवा…

बारामती नगर परिषदेतील संगणक चालक, ठेकेदारांवर नगरपरिषद मेहरबान असल्याची चर्चा नगर परिषदमधील ठेकेदारांच्या वर्तुळात चर्चा असल्याची अफवा पसरली आहे. सन 2018 ते 2019 एक वर्षासाठी दिलेल्या ठेका 20 संगणक कर्मचाऱ्यांसाठी होता. एका वर्षात त्यात 52 दिवस हे रविवारची आठवडे सुट्टी होती. यानंतर 48 आठवडे शनिवारची सुट्टी धरली. परंतु ठेक्यातील किंमत कमी केलेली नाही. सदर परिषदेचा 6139440 रुपयाचा ठेका 20 कर्मचाऱ्यांसाठी होता. तसेच 20 संगणक चालकांसाठी एका महिन्यात 26 दिवस काम होते. परंतु वास्तविक कमी कर्मचारी कामात असल्याचे परिषेचे अधिकारी व कर्मचारी सांगत आहे. त्यामुळे दर महिन्याला लाखो रूपयाचा बुरगुंडा बारामती नगरपरिषदेला बसल्याचे बोलले जात आहे. यातील किती टक्का कोणा- कोणाला मिळतो, हे निश्चित काही दिवसांनी समजेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *