निरा डावा कालवा अस्तरीकरणाचे काम थांबवा- अजित पवार

पुण्यातील जीबीएस साथीबाबत माहिती देताना उपमुख्यमंत्री अजित पवार, नागरिकांना कच्चे चिकन टाळण्याचा सल्ला

बारामती, 24 ऑगस्टः बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातून जात असलेल्या निरा डावा कालव्याचे अस्तरीकरणाचे काम सुरु आहे. मात्र सदर काम थांबविण्याच्या सूचना राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. या बाबतची माहिती सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी माध्यमांना दिली आहे.

बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये भरली चिमुकल्यांची शाळा

जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्यापर्यंत निरा डावा कालवा अस्तरीकरणाबाबतच्या संपुर्ण तालुक्यातील जनतेच्या भावना पोहचल्या आहेत. आजपर्यंत पवार कुटुंबीयांनी शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्यांच्या विरोधी किंवा त्यांचे नुकसान होईल, असे काम केलेले नाही. त्यामुळेच अजित पवार यांच्यासोबत पुरुषोत्तम जगताप यांचे फोनवरुन बोलणे झाले असता, त्यांना याबाबत सर्व जनभावना जगताप यांनी सांगितली. यामुळे अजित पवार यांनी निरा डावा कालवाच्या अस्तरीकरणाचे काम थांबवण्याची सुचना संबधीत शासकीय यंत्रणेला दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *