पुणे, 24 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) बदलापूर येथील एका शाळेतील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने आज राज्यभरातील विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हातावर काळ्या पट्ट्या बांधून या घटनेचा निषेध केला. यावेळी महाविकास आघाडीच्या वतीने राज्यातील ठाणे, पुणे, मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, संगमनेर, अक्कलकोट, सिंधुदुर्ग, नागपूर, धुळे, मोहोळ, मंगळवेढा यांसारख्या अनेक शहरांत निषेध आंदोलन करण्यात आले.
https://x.com/ANI/status/1827222311092576314?s=19
https://x.com/Awhadspeaks/status/1827261504330059955?s=19
https://x.com/ANI/status/1827229201499308318?s=19
महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आंदोलनात सहभागी
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांसारखे नेते विविध ठिकाणी सहभागी झाले होते. राज्यात महिलांवर सातत्याने होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात आज शिवसेना भवन येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले. तसेच बदलापूर घटनेच्या निषेधार्थ आज काँग्रेसकडून राज्यातील अनेक शहरांत निषेध आंदोलन करण्यात आले.
https://x.com/supriya_sule/status/1827242457026695225?s=19
शरद पवारांचा सरकारवर निशाणा
दरम्यान, बदलापूरसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी घडलेल्या महिला अत्याचारांच्या घटनांचा निषेध करण्यासाठी पुण्यात महाविकास आघाडीच्या वतीने आज मुक आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे नते सहभागी झाले. यावेळी शरद पवारांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. “महाराष्ट्रात असा एकही दिवस जात नाही जेव्हा महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या येत नाहीत. सरकारने या घटनेचा गांभीर्याने विचार करायला हवा. विरोधक राजकारण करत असल्याचं सरकार म्हणतंय. यावरून सरकार किती असंवेदनशील आहे हे दिसून येते,” असे शरद पवार म्हणाले आहेत.
https://x.com/NCPspeaks/status/1827261456662065320?s=19
सुप्रिया सुळे यांनी निषेध व्यक्त केला
यावेळी खासदार सुप्रिया यांनीही लैंगिक अत्याचारांच्या घटनांविरोधात निषेध व्यक्त केला. बदलापूर, सातारा, कोल्हापूर व दौंड अशा सर्व ठिकाणी घडलेल्या घटना पाहता प्रशासनाकडून अपेक्षित सहकार्य दिसत नाही. पोलिसांनी नोंद घेतली नाही म्हणून अशा घटना वाढत आहेत, वर्दीची भीती राहिलेली नाही. बदलापूरच्या घटनेतील आरोपीला जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत महाविकास आघाडीचा कुठलाही कार्यकर्ता स्वस्थ बसणार नाही. महाराष्ट्रातील कुठल्याही लेकीवर अत्याचार होऊ देणार नाही याची आपण सगळेजण मिळून जबाबदारी घेऊ. असे सुप्रिया सुळे यांनी यावेळी म्हटले आहे.
तर जाहीरपणे मुख्यमंत्र्यांचा सत्कार करू: सुप्रिया सुळे
पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी लेकीबाळींवरील अत्याचाराच्या दुर्दैवी घटना वाढतच आहेत. त्यामुळे प्रशासनाचा मी जाहीर निषेध करते. बदलापूरच्या आंदोलनातील लोकं बाहेरचे होते असा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला होता. ते भारतीय लोक आपल्या लेकीसाठी लढत होते, याची नोंद सरकारने घेतली पाहिजे. अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी एक स्टेटमेंट दिली की, “दोन महिन्यांत आरोपीला फाशी दिली.” अशी कृती जर झाली असेल आणि ते जर सत्य असेल तर आपण जाहीरपणे त्यांचा सत्कार करू, असे देखील सुप्रिया सुळे यांनी यावेळी म्हटले आहे.