बारामती, 3 डिसेंबरः बारामती येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे आज, 3 जानेवारी 2022 रोजी सकाळी महाराष्ट्र राज्य ऑलम्पिक स्पर्धेच्या निमित्ताने पुणे विभागातील क्रीडा ज्योत रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. क्रीडा ज्योत रॅलीचा शुभारंभ उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी तहसिलदार विजय पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, बारामती तालुका क्रीडा अधिकारी अनिल सातव, दौंड तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले आदी उपस्थित होते.
‘या’ योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
राज्य स्तरावरील महाराष्ट्र ऑलिम्पिक कबड्डी स्पर्धा पार पाडण्याचा मान बारामतीला मिळाला असल्याचे मत दादासाहेब कांबळे यांनी व्यक्त केले. या कबड्डी स्पर्धा चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी उत्तम नियोजन करण्यात येत आहे. या क्रीडाज्योत रॅलीमुळे बारामती शहरात स्पर्धांसाठी अनुकूल वातावरण निर्माण होण्यास मदत होणार आहे, असे त्यांनी सांगितले.
पुणे विभागातील या क्रीडा ज्योत रॅलीचे चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात आले. राष्ट्रीय कबड्डीपटू दादा आढाव, विद्या प्रतिष्ठान आर्ट्स कॉमर्स, सायन्स कॉलेज व तुळजाराम चतुरचंद कॉलेजचे विद्यापीठ व राष्ट्रीय खेळाडू यांनी क्रीडा ज्योत घेऊन रॅलीत सहभाग घेतला. रॅलीत मार्गावरील शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी, क्रीडा मंडळे, खेळाडू सहभाग घेणार आहेत.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंना प्रशासनाकडून अभिवादन
शहरातील तीन हत्ती चौक, भिगवण चौक, सुभाष चौक, गांधी चौक, गुणवडी चौक, कारभारी सर्कल, महात्मा फुले चौक, खंडोबा नगर पेट्रोल पंप मार्गे काऱ्हाटी चौक, मोरगाव, जेजुरी, सासवड, फुरसुंगी, हडपसर ते विभागीय क्रीडा संकुल येरवडा असा क्रीडाज्योत रॅलीचा मार्ग आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी उपक्रमाबाबत माहिती देवून रॅलीच्या मार्गावर वाहतूक नियोजन व सुरक्षा व्यवस्था केल्याचे सांगितले.
One Comment on “बारामतीत राज्य ऑलम्पिक स्पर्धा क्रीडाला सुरुवात”