मुंबई, 25 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटी बसच्या प्रवासी भाड्यात 14.95 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही भाडेवाढ आज (25 जानेवारी) मध्यरात्रीपासून लागू करण्यात आली आहे. याची माहिती राज्य परिवहन महामंडळाने दिली आहे.
https://x.com/MahaDGIPR/status/1882824853318955434?t=CmEBe-_x51E2pOLzZzvU7w&s=19
https://x.com/ANI/status/1882991486838698396?t=k4o8khqQOwChpjM6rdm_Ug&s=19
भाडेवाढ का?
महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डिझेल, टायर, चेसीस यांच्या किमतीत झालेली वाढ आणि महागाई भत्त्यातील बदल यामुळे ही भाडेवाढ आवश्यक आहे. परिवहन महामंडळाच्या उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांच्या प्रस्तावानुसार, ही भाडेवाढ राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत मान्य करण्यात आली आहे. तर यापूर्वीची भाडेवाढ 26 ऑक्टोबर 2021 रोजी करण्यात आली होती.
बस सेवा भाडेवाढ पुढीलप्रमाणे: (प्रति 6 किमी साठी)
1. साधी बस
सध्याचे भाडे: 8.70 रुपये
नवीन भाडे: 10.05 रुपये
प्रथम टप्प्यात भाडे (अपघात निधीसह): 11 रुपये
2. जलद सेवा (साधारण)
सध्याचे भाडे: 8.70 रुपये
नवीन भाडे: 10.05 रुपये
प्रथम टप्प्यात भाडे (अपघात निधीसह): 11 रुपये
3. रात्र सेवा (साधारण बस)
सध्याचे भाडे: 8.70 रुपये
नवीन भाडे: 10.05 रुपये
प्रथम टप्प्यात भाडे (अपघात निधीसह): 11 रुपये
4. निम आराम बस
सध्याचे भाडे: 11.85 रुपये
नवीन भाडे: 13.65 रुपये
प्रथम टप्प्यात भाडे (अपघात निधीसह): 15 रुपये
5. विनावातानुकूलीत शयन आसनी
सध्याचे भाडे: 11.85 रुपये
नवीन भाडे: 13.65 रुपये
प्रथम टप्प्यात भाडे (अपघात निधीसह): 15 रुपये
6. विनावातानुकूलीत शयनयान
सध्याचे भाडे: 11.85 रुपये
नवीन भाडे: 14.75 रुपये
प्रथम टप्प्यात भाडे (अपघात निधीसह): 16 रुपये
7. शिवशाही (वातानुकूलीत)
सध्याचे भाडे: 12.35 रुपये
नवीन भाडे: 14.20 रुपये
प्रथम टप्प्यात भाडे (अपघात निधीसह): 16 रुपये
8. जनशिवनेरी (वातानुकूलीत)
सध्याचे भाडे: 12.95 रुपये
नवीन भाडे: 14.90 रुपये
प्रथम टप्प्यात भाडे (अपघात निधीसह): 17 रुपये
9. शिवशाही स्लिपर (वातानुकूलीत)
सध्याचे भाडे: 13.35 रुपये
नवीन भाडे:15.35 रुपये
प्रथम टप्प्यात भाडे (अपघात निधीसह): 17 रुपये
10. शिवनेरी (वातानुकूलीत)
सध्याचे भाडे: 18.50 रुपये
नवीन भाडे: 21.25 रुपये
प्रथम टप्प्यात भाडे (अपघात निधीसह): 23 रुपये
11. शिवनेरी स्लिपर (वातानुकूलीत)
सध्याचे भाडे: 22 रुपये
नवीन भाडे: 25.35 रुपये
प्रथम टप्प्यात भाडे (अपघात निधीसह): 28 रुपये
12. ई-बस 9 मीटर (वातानुकूलीत)
सध्याचे भाडे: 12 रुपये
नवीन भाडे: 13.80 रुपये
प्रथम टप्प्यात भाडे (अपघात निधीसह): 15 रुपये
13. ई-शिवाई / ई-बस 12 मीटर (वातानुकूलीत)
सध्याचे भाडे: 13.20 रुपये
नवीन भाडे: 15.15 रुपये
प्रथम टप्प्यात भाडे (अपघात निधीसह): 17 रुपये