एसटी बस झाडाला धडकली, 25 प्रवासी जखमी

यवत, 23 जून: (विश्वजीत खाटमोडे) पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत परिसरात आज एका एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात जवळपास 25 प्रवासी जखमी जखमी झाले आहेत. ही एसटी बस झाडावर आदळल्याने हा अपघात झाला. ट्रकची धडक टाळण्याच्या प्रयत्नात ही बस झाडावर आदळल्याने हा अपघात झाला असल्याचे सांगितले जात आहे. या अपघातात संबंधित एसटी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

https://x.com/PTI_News/status/1804816073566421486?s=19

असा झाला अपघात

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन या बसमधून सर्व प्रवाशांना बाहेर काढले. त्यानंतर त्यांनी जखमींना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ही एसटी बस सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरहून मुंबईकडे जात होती. त्यावेळी वाटेत अचानक एक ट्रक थांबला. त्यामुळे या बस चालकाने धडक टाळण्यासाठी बस वळवली. यात बसचे नियंत्रण सुटल्यामुळे ही बस दौंड तालुक्यातील यवत परिसरातील सहजपूर फाट्याजवळ एका झाडाला धडकली, असे स्थानिक लोकांनी सांगितले. दरम्यान, हा अपघात इतका गंभीर होता की त्यामुळे या बसच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

https://x.com/ANI/status/1804819651630932082?s=19

काही जणांची प्रकृती गंभीर

अपघातानंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. दरम्यान, या अपघातात जवळपास 25 प्रवासी जखमी जखमी झाले आहेत. तर त्यापैकी 2 ते 3 प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *