बंगळुरू, 26 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज (दि.26) झालेल्या सामन्यात श्रीलंकेने गतविजेत्या इंग्लंडचा 8 गडी राखून पराभव केला आहे. विशेष म्हणजे, या विश्वचषकातील 5 सामन्यांमधील इंग्लंडचा हा चौथा पराभव आहे. या परभवामुळे इंग्लंड 2023 च्या विश्वचषकातून जवळपास बाहेर पडला आहे. हा सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झाला या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 156 धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेने 2 गडी गमावून 160 धावा केल्या. त्याचबरोबर त्यांनी हा सामना 8 गडी राखून जिंकला.
https://twitter.com/cricketworldcup/status/1717539202072445326?t=BtRMK429g4I1bNMTW82zcQ&s=19
धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त बौद्ध समाजाचा भव्य मेळावा
तत्पूर्वी, या सामन्यात इंग्लंड संघात 3 बदल करण्यात आले होते. यावेळी दुखापतग्रस्त रीस टोपली, हॅरी ब्रूक आणि गस ऍटिन्सन यांच्याजागी ख्रिस वोक्स, मोईन अली आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांना संधी देण्यात आली. यासोबतच अँजेलो मॅथ्यूज आणि लाहिरू कुमरा यांचे श्रीलंकेच्या संघात पुनरागमन झाले. या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 33.2 षटकांत 156 धावा केल्या. यावेळी श्रीलंकेचा अनुभवी अष्टपैलू अँजेलो मॅथ्यूजने इंग्लंडविरुद्ध संघाला पहिले यश मिळवून दिले. त्याने डावाच्या सातव्या आणि त्याच्या पहिल्याच षटकात डेव्हिड मलानला बाद केले. त्याने 28 धावा केल्या. तर इंग्लंडकडून बेन स्टोक्स याने सर्वाधिक 43 धावा केल्या. यासाठी त्याला 73 चेंडूंचा सामना करावा लागला. त्याचबरोबर जॉनी बेअरस्टोने 30 धावांची खेळी केली. या व्यतिरिक्त इंग्लंडच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते 7500 कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन
या सामन्यात इंग्लंडच्या 6 फलंदाजांना दुहेरी धावसंख्या देखील करता आली नाही. यावेळी श्रीलंकेकडून गोलंदाजीत लहिरू कुमारा याने 3 गडी बाद केले. तर एंजेलो मैथ्यूज आणि कसुन रजिथा यांनी 2 आणि महीश तीक्ष्णा याने 1 गडी बाद केला. त्यानंतर 157 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेच्या डावाची सुरुवात खराब झाली. यावेळी श्रीलंकेचा कुसल परेरा (4) पुन्हा एकदा लवकर बाद झाला. सोबतच कुसल मेंडिस देखील 11 धावा करुन बाद झाला. त्यानंतर श्रीलंकेच्या पथुम निसांका आणि सदीरा समरविक्रमाने नाबाद 137 धावांनी भागीदारी करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात इंग्लंडतर्फे डेव्हिड विली याने श्रीलंकेचे 2 गडी बाद केले. दरम्यान या पराभवामुळे इंग्लंडचे या स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. तर इंग्लंडचा पुढचा सामना 29 ऑक्टोंबर रोजी टीम इंडियासोबत होणार आहे.
One Comment on “इंग्लंडला श्रीलंकेने हरवले! वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडचा चौथा पराभव”