श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाची उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम

बारामती, 8 जानेवारीः (प्रतिनिधी- बाळासाहेब बालगुडे) बारामती तालुक्यातील मुर्टी येथील रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, मुर्टी शाळेतील इयत्ता 8 वीमधील विद्यार्थिनी सिद्धी अरुण माघाडे हिला जिल्हा गुणवत्ता यादीत येण्याचा बहुमान मिळाला आहे. यामुळे श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, मूर्टी या शाळेने शिष्यवृती परीक्षेच्या निकालामध्ये उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.

दरम्यान, 2021-22 घेण्यात आलेल्या शिष्यवती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या निकालात सिद्धी माघाडे हिला जिल्हा गुणवत्ता यादीत येण्याचा बहुमान मिळाला आहे.
या निकालानंतर यशस्वी विद्यार्थिनी, पालक आणि मार्गदर्शक शिक्षक यांचे विद्यालयामार्फत नुकताच सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आले.

यावेळी विद्यार्थिनी सिद्धी माघाडे हिला मार्गदर्शन करणारे विभागप्रमुख अंबुले एस.बी. मॅडम, विषयशिक्षक गावित जी.पी. सर, भुसे एस. बी. सर, तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यासह ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हे यश विद्यालयास प्राप्त झाले आहे ते विद्यालयाचे मुख्याध्यापक काकडे डी.जी. सर, पर्यवेक्षक माने टी.एन. सर यांचेही यावेळी अभिनंदन करण्यात आले.

या प्रसंगी विभागीय अधिकारी किसन रत्नपारखी, सहाय्यक विभागीय अधिकारी शंकर पवार, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य नलावडे एल.ए., जगदाळे आर.व्ही. यावेळी उपस्थित होते.

One Comment on “श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाची उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *