बारामती, 11 ऑगस्टः (प्रतिनिधी बाळासाहेब बालगुडे) बारामती तालुक्यातील मुर्टी गावामधील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात अमृत महोत्सवानिमित्त 10 ऑगस्ट 2022 रोजी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात एकूण 104 महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सरपंच मंगल खोमणे यांनी स्विकारले. रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेला वंदन करून या कार्यक्रमाला सुरुवात झाली. सदर मेळाव्यात उत्स्फुर्तपणे रांगोळीची स्पर्धा घेण्यात आल्या.
बारामतीत तक्रार केल्याच्या कारणावरून महिलेला मारहाण
या कार्यक्रमात हर घर झेंडा याचे स्वरूप सांगितले. महिलांसाठी आरोग्याचे महत्व सांगितले. त्याचप्रमाणे अमृत महोत्सव घोषणा देखील महिलांनी केल्या. त्याचप्रमाणे माजी स्वातंत्र सैनिक सुनील शिंदे याचा देखील यावेळी सत्कार केला. श्रावणी कारंडे हिने मोबाईलचे दुष्परिणाम सांगितले. कल्याणी भोसले स्वातंत्र्याचे महत्व सांगितले. मुख्याध्यापक गाढवे सर आणि पर्यवेक्षक माने सरांनी देखील मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला ग्रामसेवक पवार मॅडम, अंगणवाडी सुपरवायझर पवार मॅडम, ग्रामपंचायत सदस्य जगदाळे मॅडम, बालगुडे मॅडम, चव्हाण मॅडम, जगताप मॅडम, गदादे मॅडम, मोरे मॅडम, पोलिस पाटील गदादे मॅडम, सुप्रिया राजपुरे, शिक्षिका जाधव मॅडम, ठोंबरे मॅडम, मोरे मॅडम व आंबूले मॅडम उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन तांबे एस एन मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक, पर्यवेक्षक आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख तांबे सारिका यांनी केले. या कार्यक्रमाला पत्रकार बाळासाहेब बालगुडे आवर्जून उपस्थित होते. सर्व शिक्षक वृंदांच्या सहकार्याने कार्यक्रम व्यवस्थित पार पडला.