बारामतीत मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरू

बारामती, 9 नोव्हेंबरः भारत निवडणूक आयोगाने घोषित केल्याप्रमाणे 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरू झाला आहे, अशी माहिती बारामती विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली आहे. या कार्यक्रमांतर्गत एकत्रीकृत प्रारुप मतदार याद्या 9 नोव्हेंबर 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

दैदिप्यमान यशाबद्दल प्रज्योत साबळेचा जाहीर सत्कार!

यासह 9 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 2022 या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. यासह 19 नोव्हेंबर, 20 नोव्हेंबर, 3 डिसेंबर आणि 4 डिसेंबर 2022 या दिवशी सर्व मतदान केंद्रावर मतदार नोंदणीसाठीचे अर्ज, दावे व हरकती स्वीकारणे आदींसाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. तर 26 डिसेंबर 2022 पर्यंत दावे व हरकती निकालात काढले जाणार आहेत. मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी 5 जानेवारी 2023 रोजी करण्यात येणार आहे.

बारामतीत राष्ट्रवादीकडून कृषिमंत्री अब्दुल सत्तारांचा जाहीर निषेध

या कार्यक्रमादरम्यान नवीन मतदार नोंदणी, मयत, स्थलांतरित मतदार तसेच दुबार नावे वगळणे, नावात, पत्ता, इतर तपशीलात दुरूस्ती, मतदार नोंदीचे स्थानांतरण आदी अर्जांवर कार्यवाही करण्यात येणार आहे. मोहिमेदरम्यान आवश्यक नमुना अर्ज भरुन आपल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याकडे (बूथ लेव्हल ऑफीसर- बीएलओ) द्यावेत. तसेच या सर्व सुविधा ऑनलाईनरित्या https://www.nvsp.in या संकेतस्थळावरही उपलब्ध आहेत.

मतदार याद्या अधिक अचूक आणि दोषरहीत करण्याच्या दृष्टीने नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही मतदार नोंदणी अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले आहे.

One Comment on “बारामतीत मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरू”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *