कोलकाता, 05 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज सामना होणार आहे. हा सामना दुपारी 2 वाजता होणार असून, तो कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत भारताने आपल्या सर्वच्या सर्व 7 सामन्यात विजय मिळवला आहे. या कामगिरीमुळे भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. तसेच दक्षिण आफ्रिका देखील 7 पैकी 6 सामने जिंकून भारताच्या मागे आहे. आफ्रिका संघ दुसऱ्या स्थानावर आहे. तर भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ यापूर्वीच उपांत्य फेरीत दाखल झाले आहेत. आजच्या खेळपट्टीबद्दल बोलायचे झाल्यास, ईडन गार्डन्सची खेळपट्टी नेहमीच फलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. खेळपट्टीवर चांगली उसळी असल्याने चेंडू सहज बॅटवर येतो. मात्र, या मैदानावर फलंदाजांसोबतच वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटूंनाही मदत होते.
दरम्यान, भारताने यापूर्वीचे सर्व सात सामने जिंकले आहेत. मात्र आजच्या सामन्यात भारतीय संघासमोर दक्षिण आफ्रिकेचे सर्वात मोठे आव्हान असणार आहे. त्यामुळे नंबर एकच्या लढाईसाठी दोन्ही संघांसाठी आजचा सामना अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. तत्पूर्वी, या सामन्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या दुखापतीमुळे विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी आता प्रसिध कृष्णाचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. प्रसिध कृष्णा हा प्रथमच विश्वचषक स्पर्धा खेळणार आहे. तर भारतीय संघाला येत्या सामन्यांत हार्दिक पांड्याची उणीव भासण्याची शक्यता आहे.
ग्रामपंचायत निवडणूक! अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांची प्रतिष्ठा पणाला
तर भारताचा कर्णधार रोहित शर्मा हा सध्या तुफान फॉर्मात आहे. त्याने विश्वचषकातील 7 सामन्यांत 57.43 च्या सरासरीने 407 धावा केल्या आहेत. याशिवाय विराट कोहलीने देखील या स्पर्धेत शानदार कामगिरी केली आहे. विराटने या विश्वचषकात 88.40 च्या सरासरीने 442 धावा केल्या आहेत. विराट कोहलीने वनडेत 48 शतके ठोकली आहेत. सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी करण्यासाठी तो फक्त एक शतक दूर आहे. तर विराट कोहलीचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे विराट कोहलीने आजच्या सामन्यात शतक करावे, अशी अपेक्षा त्याचे चाहते करीत आहेत. दुसरीकडे मात्र आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डी कॉक या स्पर्धेत जबरदस्त खेळी करताना दिसत आहे. त्याने या विश्वचषकात 4 शतकांसह 545 धावा केल्या. या स्पर्धेत सर्वाधिक धावांच्या बाबतीत तो अव्वल स्थानी आहे. त्यामुळे भारतीय गोलंदाजांसमोर क्विंटन डी कॉकचे मोठे आव्हान असणार आहे.
शारदानगर माऊलीचा होलसेल केमिकल नशा?
One Comment on “वर्ल्डकपमध्ये भारतासमोर आज दक्षिण आफ्रिकेचे आव्हान”