सोलापूर, 19 मे: (विश्वजीत खाटमोडे) सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट रोडवरील एमआयडीसीमधील सेंट्रल टेक्सटाईल मिलमध्ये रविवारी (दि.18) पहाटे भीषण आग लागून आठ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत तीन महिला व एका बालकाचाही समावेश आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
https://x.com/PTI_News/status/1924088912903102954?t=p7EcslOHNEUJyG_oVbpYzg&s=19
आगीत 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू
प्राथमिक माहितीनुसार, रविवारी पहाटे पावणे चार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग विद्युत शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. सोलापूर एमआयडीसीमधील अक्कलकोट रोडवर असलेल्या सेंट्रल टेक्सटाईल मिल्समध्ये ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये कारखान्याचे मालक हाजी उस्मान हसनभाई मन्सुरी, त्यांचे तीन कुटुंबीय, यामध्ये त्यांचा दीड वर्षाचा नातू तसेच चार कामगारांचा समावेश आहे.
https://x.com/PTI_News/status/1924125373643849962?t=z1nWQQbTal0Y9JRKWZse2A&s=19
केंद्राकडून आर्थिक मदत
या दुर्घटनेबाबत पंतप्रधान कार्यालयाने शोक व्यक्त केला आहे. “सोलापूरमधील आगीनंतर प्राणहानी झाल्याच्या घटनेने मन हेलावून गेले आहे. ज्या कुटुंबांनी आपले आप्तस्वकीय गमावले आहेत त्यांना माझी संवेदना. जखमींना लवकर बरे वाटो अशी प्रार्थना. मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत देण्यात येईल, तर जखमींना 50 हजार रुपये देण्यात येतील,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले.
https://x.com/Dev_Fadnavis/status/1924114860922618076?t=Y97Q0DzTvB9z4-JoC_4hfg&s=19
राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या दुर्घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या. “सोलापूरच्या अक्कलकोट रोडवरील टेक्सटाईल युनिटमध्ये लागलेल्या आगीत 8 जणांचा मृत्यू ही अतिशय दु:खद घटना आहे. त्यांना मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मुख्यमंत्र्यांच्या मदतनिधीतून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल,” असे फडणवीस यांनी सांगितले.