बारामती, 9 मार्चः (प्रतिनिधी- शरद भगत) बारामती तालुक्यातील मुर्टी येथील कोमल जगताप व प्रशांत जगताप यांच्या जुळ्या मुलींचा द्वितीय वाढदिवस मोढवे येथील यशवंतराव मोरे पाटील आश्रम शाळा येथे नुकताच साजरा केला. या वाढदिवसानिमित्त आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना मिष्ठान्नाचे जेवण देखील जगताप दाम्पत्यांनी दिले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सवची नूतन समिती गठीत
जगताप दाम्पत्यांनी गेल्या वर्षी पहिल्या वाढदिवसानिमित्त मुर्टी गावामध्ये वृक्षारोपण तसेच ह.भ.प. शिवलीलाताई पाटील यांचे शुषश्राव्य असे किर्तन आयोजित केले होते. याही वर्षी आश्रम शाळेत केक कापून व मिष्ठान्नाचे जेवण देऊन सामाजिक बांधिलकी जपली.
बारामतीत भाजपा किसान मोर्चा शाखेचे उद्घाटन
याप्रसंगी मुर्टी गावचे उपसरपंच किरण जगदाळे, तानाजी राजपुरे, संतोष शिंदे, हरीदास जगदाळे, गणेश जगदाळे, संदीप गाढवे, ग्रामपंचायत सदस्या माधुरी चव्हाण, पत्रकार शरद भगत, लोणकर सर, तुपे सर, नवनाथ जगदाळे सर यासह विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार नवनाथ जगदाळे सर यांनी केले. आश्रमशाळेतील सर्वांनी हिंदवी व पार्थवी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
One Comment on “आश्रम शाळेत वाढदिवस साजरा करत जपली सामाजिक बांधिलकी”