लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत 1.41 कोटींहून अधिक अर्ज दाखल! पुणे जिल्ह्यात सर्वाधिक महिलांचे अर्ज

मुंबई, 08 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) राज्य सरकारने लागू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेला सध्या महिलांचा तुफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत राज्यातील एकूण 1 कोटी 41 लाख 98 हजार 898 महिलांनी त्यांचे अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी 1 कोटी 30 लाख 29 हजार 980 महिलांचे अर्ज पात्र झाले आहेत. सध्या या प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करण्यात येत आहे. अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

https://x.com/iAditiTatkare/status/1821491458534174839?s=19

पहा काही जिल्ह्यांची आकडेवारी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक महिलांचे अर्ज आलेले आहेत. पुणे जिल्ह्यात 9 लाख 73 हजार 063 अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यात 7 लाख 8 हजार 948 महिलांनी अर्ज केले आहेत. तसेच या योजनेसाठी नाशिक जिल्ह्यात 7 लाख 37 हजार 708 अर्ज, कोल्हापूर जिल्ह्यात 6 लाख 96 हजार 073 अर्ज, सोलापूर जिल्ह्यात 6 लाख 14 हजार 962 अर्ज, नागपूर जिल्ह्यात 5 लाख 79 हजार 404 अर्ज, ठाणे जिल्ह्यात 5 लाख 48 हजार 110 अर्ज, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 5 लाख 41 हजार 554 अर्ज, जळगाव जिल्ह्यात 5 लाख 33 हजार 958 अर्ज, सातारा जिल्ह्यात 5 लाख 20 हजार 828 अर्ज, सांगली जिल्ह्यात 4 लाख 59 हजार 836 अर्ज, अमरावती जिल्ह्यात 4 लाख हजार 177 अर्ज, बीड जिल्ह्यात 3 लाख 52 हजार 668 अर्ज, रायगड जिल्ह्यात 3 लाख 49 हजार 485 अर्ज आणि लातूर जिल्ह्यात 3 लाख 40 हजार 239 महिलांचे अर्ज आलेले आहेत.

नवीन वेबसाईट सुरू

दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे राहिलेल्या महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपला अर्ज दाखल करावा, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. या योजनेचा अर्ज भरण्यासाठी राज्य सरकारने आता https://ladakibahin.maharashtra.gov.in/ ही नवीन वेबसाईट सुरू केली आहे. त्यामुळे महिलांना या वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने आपला अर्ज दाखल करता येणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र महिलांना राज्य सरकारकडून दर महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *