टी. सी. कॉलेजच्या क्रीडांगणात वृक्षांची कत्तल; गुन्हा दाखल करण्याची मागणी

बारामती, 29 मार्चः बारामती शहरातील अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचे मोठे असे क्रीडांगण आहे. मात्र या क्रीडांगणात वृक्षांची बेकायदेशीररित्या कत्तल करून वृक्षांच्या खोडाला आग लावून पूर्णपणे नेस्तनाबूद करण्याचा डाव केला असल्याची तक्रार तैनुर शेख यांनी बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे दाखल केली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाची नवीन कार्यकारिणी जाहीर

निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आणि निरोगी पर्यावरण निर्मितीसाठी देशात 33 टक्के भूभाग वनखाली असावा, असे निसर्गतज्ज्ञांचे सांगत असताना, टी. सी. कॉलेजचे प्राचार्य, संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांनी बेकायदेशीर विनापरवानगी वृक्षांची कत्तल करून, वृक्षांच्या खोडाला आग लावून पूर्णपणे नेस्तनाबूद केले. या प्रकरणी महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध अधिनियम, 1995 मधील कलम 2 (ग) व 3 तसेच महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम 1975 आणि महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण आणि संवर्धन नियम 2009 सह शासन आदेश अधिसूचना मधील कलम 21(1) व 2 नुसार विनापरवानगी वृक्षतोड / वृक्षछाटणी केल्याप्रकरणी दखलपात्र गुन्हे दाखल करण्यात यावे, असे लेखी पत्रात नमूद केले आहे.

पुण्याच्या माजी पालकमंत्र्यांचे निधन; शरद पवारांनी वाहली श्रद्धांजली!

संबंधितावर गुन्हे दाखल करावे, अन्यथा आपणा विरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन, उपोषण करावे लागेल. तसेच वेळ पडल्यास न्यायालयात याचिका दाखल करावी लागेल, असेही दिलेल्या लेखी अर्जात म्हटले आहे. सदर अर्जाच्या प्रती जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी बारामती व वनपरिक्षेत्र अधिकारी बारामती यांना मेलद्वारे दिलेल्या आहेत.

One Comment on “टी. सी. कॉलेजच्या क्रीडांगणात वृक्षांची कत्तल; गुन्हा दाखल करण्याची मागणी”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *