बारामती उपविभाग कृषि उत्पन्न सेवक पतसंस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष आणि वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

बारामती, 14 जून: (विश्वजीत खाटमोडे) बारामती उपविभाग कृषि उत्पन्न बाजार समिती सेवक पतसंस्थेची सन 2023-24 ची 24 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पतसंस्थेचे अध्यक्ष अरविंद जगताप यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. तसेच या सेवक पतसंस्थेच्या स्थापनेला 25 वर्षे झाली. त्याबद्दल या पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचा कार्यक्रम 12 जुन रोजी उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात स्मरणिका प्रकाशन, इयत्ता दहावी आणि बारावीत 80 टक्क्यांपेक्षा जादा गुण मिळेलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, शाल, बुके आणि नारळ देऊन सत्कार करण्यात आला.



तसेच सेवकांची मुले जी डॉक्टर, इंजिनिअर, बी.टेक उर्तीर्ण झाली आहेत. त्यांचा देखील यावेळी सत्कार व सन्मान करण्यात आला. हा सत्कार बारामती बाजार समितीचे सभापती सुनिल पवार आणि नीरा बाजार समितीचे सभापती शरदराव जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. रौष्य महोत्सवी वर्ष आनंदात व खेळीमेळीत साजरे झाल्याने ही सभा उत्साहात पार पडली. या सभेचे सुत्रसंचलन सुर्यकांत मोरे आणि शरद भोसले यांनी केले. तर उपाध्यक्ष आशपाक मुलाणी यांनी उपस्थितांचे आभार मानले.



या कार्यक्रमाचे प्रस्ताविक पतसंस्थेचे अध्यक्ष अरविंद जगताप यांनी केले. यावेळी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षा निमित्त उपस्थित मान्यवरांच्या हस्ते केक कापून आणि स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर सभापती सुनिल पवार आणि शरदराव जगताप यांनी अध्यक्षीय भाषण केले. याप्रसंगी त्यांनी पतसंस्थेच्या कामकाजाबाबत कौतुक केले. त्यांनी आपल्या भाषणात, सेवक पतसंस्था कमी व्याजदरात कर्ज देऊन सेवकांच्या गरजा भागवते, मात्र बाहेरचे कुठेही कर्ज घेतले जात नाही. असेच आदर्श काम यापुढे ही करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

या सेवक पतसंस्थेचे भाग भांडवल 1.86 कोटी असून, कर्ज मर्यादा 5 लाख ते 38 लाख रुपयांपर्यंत आहे. कर्जावरील व्याजदर 6.65 टक्के असून, गेली 24 वर्षे पतसंस्थेला लेखा परिक्षण अ वर्ग मिळाला आहे. गेली 24 वर्षे पतसंस्था जून अखेरपर्यंत वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करून सभासदांना दरवर्षी लाभांश वाटप केले जाते. यावर्षी 6.40 टक्के लाभांश वाटप करण्यात आला आहे. यापुढे सेवक पतसंस्थेने कर्जदारांची विमा पॉलिसी काढण्यासंदर्भातील निर्णय वार्षिक सभेत घेण्यात आला. तसेच पगारानुसार कर्ज मर्यादा ठरवताना पगाराचा दर 5 हजाराचे टप्प्यात कर्ज मर्यादा ठरविण्यात आली आहे.

यावेळी बारामती बाजार समितीचे उपसभापती निलेश लडकत व सदस्य तसेच नीरा बाजार समितीचे सदस्य प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित होते. सेवक पतसंस्थेचे उपाध्यक्ष आशपाक मुलाणी, व्यवस्थापक रविंद्र तरटे आणि संचालक सुर्यकांत मोरे, शरद भोसले, बाबासाहेब देवकाते, सुरेखा कुर्ले, कृष्णांत खलाटे, अविनाश बळगानुरे, तुषार माने, संतोष शिंदे आणि सभासद तसेच दौंड बाजार समितीचे सचिव मोहन काटे उपस्थित होते.

दरम्यान, बारामती उपविभाग कृषि उत्पन्न बाजार समिती सेवक सहकारी पतसंस्थचे रौप्यमहोत्सवी वर्ष आणि या सेवक सहकारी पतसंस्थची 24 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच उत्साहात संपन्न झाली. बारामती, दौंड, इंदापुर व पुरंदर या तालुक्यातील बाजार समिती सेवकांची मिळून, बारामती उपविभाग कृषि उत्पन्न बाजार समिती सेवक सहकारी पतसंस्थेची स्थापना 2000 साली करण्यात आली होती. त्यावेळी बारामती बाजार समितीचे संस्थापक चेअरमन म्हणून सचिव अरविंद जगताप होते. तर आज ही योगायोगाने या रौप्य महोत्सवी वर्षात देखील अरविंद जगताप हेच अध्यक्ष आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *