बारामतीत सकल जैन समाजाच्या वतीने मुक मोर्चा!

बारामती, 21 डिसेंबरः (प्रतिनिधी- दिलीप खरात) झारखंड राज्याच्या गिरीडीह जिल्ह्यातील छोटा नागपूर पठारमधील पारसनाथ पर्वतावरील जैन धर्मियांचे तीर्थक्षेत्र श्री सम्मेद शिखरजी हे ठिकाण पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ आज, 21 डिसेंबर 2022 रोजी बारामती शहरात सकल जैन समाजाच्या वतीने बंदची हाक देण्यात आली आहे.

मोरगांव ग्रामपंचायत निवडणूक झाली चुरशीची!

तसेच सकल जैन समाजाच्या वतीने बारामती शहरातून आज, बुधवारी मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच सकल जैन समाजाकडून शहरातील दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सदर मूक मोर्चा शहरातील श्री महावीर भवन येथून सकाळी 10 वाजता निघाला. तेथून मोर्चा भिगवण चौक, गांधी चौक, गुणवडी चौकमार्गे बारामती उपविभागीय कार्यालयाकडे गेला. सदर ठिकाणी सकल जैन समाजाच्या मागण्याचे निवेदन प्रांताधिकाऱ्यांकडे देण्यात आले.

पणदरे ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर!

सदर मूक मोर्चात जैन समाजामधील पुरुष आणि महिल वर्ग, लहान मुले तसेच कामगार वर्ग देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर मूक मोर्चा उपविभागीय कार्यालय येथे पोहचल्यानंतर जैन समाजातील नेते मंडळी आणि व्यापारी मान्यवरांनी आपापली मत व्यक्त करत निषेध व्यक्त केला.

One Comment on “बारामतीत सकल जैन समाजाच्या वतीने मुक मोर्चा!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *