पुणे, 10 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) सोलापूरचा कुस्तीपटू सिंकदर शेख याने यंदाची महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा जिंकली आहे. त्यामुळे सिंकदरने मानाची गदा पटकावली. महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात आज सिकंदर शेख आणि शिवराज राक्षे यांच्यात सामना झाला. यावेळी अंतिम सामन्यात सिकंदर शेखने शिवराज राक्षे याला पराभूत केले. त्याचबरोबर यंदाचा महाराष्ट्र केसरी किताब आपल्या नावावर केला. तर सिंकदर शेख हा 66 वा महाराष्ट्र केसरी ठरला आहे.
प्रदीप कंद आणि पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि भारतीय कुस्ती महासंघ, तसंच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने पुणे जिल्ह्यातील फुलगाव येथे 66 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली. या स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या लढतीत सिकंदर शेखने शिवराज राक्षेला काही सेकंदातच झोळी डावावर चितपट केले. या कामगिरीमुळे पैलवान सिकंदर शेख याच्यावर सध्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मुंबईत 2 तास फटाके फोडता येणार; हायकोर्टाचा निर्णय
हा सामना पाहण्यासाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस, मुरलीधर मोहोळ, स्वागताध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे सदस्य प्रदीप कंद, कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे, विलास कथुरे, योगेश दोडके उपस्थित होते. यावेळी हा सामना जिंकल्यानंतर या मान्यवरांच्या हस्ते सिकंदर शेख याला मानाची गदा देण्यात आली.
राज ठाकरेंवरील 13 वर्षांपूर्वीचा गुन्हा रद्द
दरम्यान, सिकंदर शेख याचे मुळ गाव सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ हे आहे. त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. त्याचे वडील हमाली करायचे. तसेच त्याचे वडील देखील पैलवान होते. आर्थिक परिस्थिती चांगली नसतानाही त्यांनी सिकंदरला पैलवान बनवले. त्यानंतर त्याने कुस्तीच्या अनेक स्पर्धा जिंकल्यामुळे त्यांच्या घरची परिस्थिती हळूहळू सुधरायला लागली.
2 Comments on “सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी ठरला!”