बहुतेक सर्वांनाच सकाळी आंघोळ केल्यानंतर किंवा काहींना आंघोळीआधी चहा पिण्याची सवय असते. चहा घेतला नाहीतर दिवसाची सुरुवात झालीच नाही, असे काहींना वाटते. त्यामुळे बहुतेक जण सकाळी चहा पिण्याला पसंत देतात. अनेकांना चहा पिल्याने ताजेतवाणे, फ्रेश झाल्यासारखे वाटते. तर काहींना चहा पिल्यानंतर उत्साह येतो, असे अनेकांना वाटते. परंतु उपाशी पोटी चहा पिल्याने आरोग्यावर विपरित परिणाम होतो, हे तुम्हाला माहिती आहे का?
तोंडाची समस्या उद्भवते
सकाळी रिकाम्या पोटी चहाच्या सवयीमुळे तोंडातील जीवाणू साखलेला बिघडवू शकतात. ज्यामुळे तोंडात ऍसिडच्या पातळीत वाढ होण्यास सुरुवात होते. यासह दातांवरील पांढरा मुलामा हळुहळु कमी होण्यास सुरुवात होते. काहींच्या दातांमध्ये पोकळी निर्माण होते, ज्यामुळे दातांमध्ये हळूहळू तीव्र वेदनांचा त्रास जाणवतो. जीवाणूंच्या हल्ल्यामुळे हिरड्यांना सुजण्याच्या समस्याही उद्भवतात.
पोटाची समस्या
बहुतेक अनेकाना दुधाचा चहा पिणे पसंत करतात. परंतु यामुळे अनेकांना पोट फुगल्याची समस्या जाणवते. कारण दुधात लैक्टोजचे प्रमाण हे अधिक असते. लैक्टोज हे रिकाम्या पोटावर आणि आतड्यांवर परिणाम करताता. यामुळे गॅस आणि बद्धकोष्ठताची समस्या उद्भवते.
शरीराचे डिहायड्रेशन होते
काही तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, चहा पिण्याच्या सेवनामुळे लघवीचे प्रमाण वाढते. चहाच्या सेवनामुळे शरीरातील आवश्यक पाणी लघवी वाटे बाहेर टाकले जाते. साधारण एक व्यक्ती हा 24 तासांत सहा किंवा आठ तासांची झोप घेत असतो. यामुळे झोपेमुळे शरीरात पाणी किंवा अन्न सेवन न केल्याने आधीच डिहायड्रेट झालेले असते. जर रिकाम्या पोटी चहाचे सेवन केल्यास जास्त प्रमाणात डिहायड्रेशन होते. यामुळे अनेकांना चक्कर येणे, थकवा जाणवणे यासारख्या समस्या जाणवू लागता. त्यामुळे शक्यतो सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी चहाचे सेवन करणे टाळावे.
अल्सरची समस्या उद्भवते
रिकाम्या पोटी चहाच्या सेवनाने मळमळ करणे, चक्कर येणे तसेच इतर समस्या उद्भवतात. तसेच अल्सरची समस्याही उद्भवते. यामुळे काहीतरी खाल्ल्यानंतर थोड्या वेळाने चहा पिणे हे आरोग्यास हितकारक राहते.
पचन क्रियेत बिघडते
नित्यक्रमाने रिकाम्या पोटी चहा पिण्याने त्याचा परिणाम सरळ पचन क्रियेवर होतो. रिकाम्या पोटी चहा पिण्याच्या सवयीमुळे अनेकांना पचन क्रियेत बिघडून पचनासंबंधीच्या अनेक समस्या उद्भवतात. सकाळी रिकाम्या पोटी चहाचे सेवण केल्याने पोटात अम्लीय आणि अल्कधर्मी पदार्थांचे असंतुलन तयार होते.
त्यामुळे शक्यतो सकाळी रिकाम्या पोटी चहाचे सेवन टाळावे. काहीतरी सेवणनंतर अथवा पाणी पिल्यानंतर चहा घेतल्याने अनेक समस्या कमी होतात.