शुभमन गिल नंबर वन फलंदाज; बाबर आझमला टाकले मागे!

दिल्ली, 8 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) आयसीसी क्रमवारीत मोठा बदल झाला आहे. आयसीसीच्या वनडे क्रमवारीत भारताचा सलामीवीर फलंदाज शुभमन गिल हा अव्वल क्रमांकाचा फलंदाज ठरला आहे. त्याने याबाबतीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याला मागे टाकले आहे. विश्वचषक सुरू होण्यापूर्वी बाबर आझम पहिल्या क्रमांकावर होता. तर तेंव्हा शुभमन गिल हा दुसऱ्या स्थानावर होता. तर दुसरीकडे, गोलंदाजीच्या क्रमवारीत मोहम्मद सिराज हा देखील आता पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने याबाबतीत पाकिस्तानच्या शाहीन शाह आफ्रिदीला मागे टाकले आहे. फलंदाजी आणि गोलंदाजीच्या क्रमवारीत भारताचे खेळाडू अव्वल स्थानी आल्यामुळे भारतीयांसाठी ही अभिमानाची बाब आहे.

या विश्वचषकात शुभमन गिलने 6 सामन्यांत 219 धावा केल्या आहेत. यामध्ये गिलने गेल्या आठवड्यात श्रीलंकेविरुद्ध 92 आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 23 धावा केल्या होत्या. या कामगिरीमुळे शुभमन गिल हा सध्या नंबर 1 चा फलंदाज बनला आहे. तर विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम हा खराब फॉर्ममधून जात आहे. त्याला काही सामन्यांमध्ये धावा करताना झगडावे लागले. बाबरने विश्वचषकात 8 सामन्यात एकूण 282 धावा केल्या आहेत. त्यामुळे बाबर आझम आता पहिल्या स्थानावरून खाली घसरला. तर बाबर हा 2 वर्षांपेक्षा अधिक काळापासून वनडे क्रमवारीत अव्वल स्थानावर होता.

ओबीसी आरक्षणाच्या याचिकेवर आज सुनावणी

शुभमन गिल सध्या 830 गुणांसह पहिल्या स्थानी आहे. तर बाबर आझम 824 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर वनडे क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचणारा शुभमन गिल हा भारताचा चौथा फलंदाज ठरला आहे. तर याच्याआधी सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली या तिघांनी ही कामगिरी केली होती. त्यामुळे शुभमन गिलचे सध्या सर्व स्तरांतून अभिनंदन केले जात आहे. दरम्यान, आयसीसीच्या वनडे क्रमवारीत शुभमन गिल व्यतिरिक्त विराट कोहली आणि रोहित शर्मा हे भारताचे खेळाडू देखील टॉप 10 मध्ये आहेत. यामध्ये विराट कोहली 770 गुणांसह चौथ्या आणि रोहित शर्मा 739 गुणांसह सहाव्या स्थानी आहे.

बलात्कार घटनेच्या निषेधार्थात जय मल्हार क्रांती संघटनेचा मोर्चा

तसेच गोलंदाजी क्रमवारीत भारताच्या मोहम्मद सिराज याने दोन स्थानांची सुधारणा करून अव्वल स्थान पटकावले आहे. या यादीत मोहम्मद सिराज 709 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर यामध्ये भारताचा कुलदीप यादव 661 गुणांसह चौथ्या, जसप्रीत बुमराह 654 गुणांसह आठव्या आणि मोहम्मद शमी 635 गुण मिळवून दहाव्या स्थानावर आहे.

2 Comments on “शुभमन गिल नंबर वन फलंदाज; बाबर आझमला टाकले मागे!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *