शुभमन गिल गुजरात टायटन्सचा कर्णधार बनला

अहमदाबाद, 27 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) आयपीएल मधील गुजरात टायटन्स या संघाने मोठी घोषणा केली आहे. हार्दिक पांड्या आता मुंबई इंडियन्समध्ये परतला आहे. त्यामुळे गुजरात टायटन्सने त्यांच्या संघाचे नेतृत्व करण्यासाठी फलंदाज शुभमन गिलची कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. यासंदर्भात गुजरात टायटन्स संघाने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. यामध्ये त्यांनी ही माहिती दिली. त्यानूसार शुभमन गिल आता आपल्याला गुजरात टायटन्सचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

https://twitter.com/gujarat_titans/status/1729049791571874216?s=19

दीपक केसरकरांनी त्या मुलीची जाहीर माफी मागावी- सुप्रिया सुळे

दरम्यान, गिलने आयपीएलमध्ये गुजरातकडून खेळलेल्या 33 डावांमध्ये 47.34 च्या सरासरीने 1373 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 3 शतके आणि 8 अर्धशतके झळकावलेली आहेत. तर शुभमन गिलसाठी आयपीएलचा गेला सिझन अत्यंत खास ठरला होता. शुभमनने गेल्या वर्षीच्या आयपीएल मधील 17 सामन्यांत 59.33 च्या सरासरीने 890 धावा केल्या होत्या. ज्यामध्ये 3 शतके आणि 4 अर्धशतकांचा समावेश होता. या कामगिरीमुळे त्याला यावेळी ऑरेंज कॅपचा विजेता देखील घोषित करण्यात आले होते. तसेच शुभमन गिलने गेल्या वर्षी मुंबई इंडियन्स विरुद्ध 60 चेंडूत 129 धावा केल्या होत्या. त्या आयपीएलच्या प्लेऑफमधील एका फलंदाजाने केलेल्या सर्वोच्च धावा ठरल्या आहेत. त्यामुळे गुजरात टायटन्स संघाने आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश केला होता.

शुभमन गिल याने गुजरात टायटन्सच्या कर्णधारपदी निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. “गुजरात टायटन्सचे कर्णधारपद स्वीकारताना मला आनंद आणि अभिमान वाटतो आणि अशा उत्कृष्ट संघाचे नेतृत्व करण्यासाठी माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल मी फ्रँचायझींचे आभार मानतो. आमच्याकडे दोन अपवादात्मक हंगाम आले आहेत. मी आता आमच्या रोमांचक क्रिकेट ब्रँडसह संघाचे नेतृत्व करण्यास उत्सुक आहे.” असे गिल यावेळी म्हणाला. तत्पूर्वी,र्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळताना गुजरात टायटन्सने त्यांच्या 2 वर्षात एकदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. तर गेल्या वर्षी त्यांना उपविजेते पदावर समाधान मानावे लागले.

अखेर हार्दिक पांड्याची मुंबई इंडियन्समध्ये वापसी!

One Comment on “शुभमन गिल गुजरात टायटन्सचा कर्णधार बनला”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *