पुरंदर / कोळविहीरे, 22 जुलैः (प्रतिनिधी- शरद भगत) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 18वी तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धेचे आयोजन पुरंदर तालुक्यातील कोळविहीरे गावातील इंदु इंग्लिश स्कुलमध्ये आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये पुरंदर तालुक्यातील 90 स्पर्धक सहभागी झाले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरंदर तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे, संस्थेचे अध्यक्ष रामदास कुटे, पत्रकार नितीन राऊत तसेच जिमाचे उपाध्यक्ष पांडुरंग सोनवणे, रणजित खारतोडे सर, माने सर (गराडे), दत्ता परदेसी सर (नायगाव) पोमणे सर (काळदरी) गायकवाड सर (हिवरे), जगताप सर (दादा जाधवराव, जुनी जेजुरी), बेंगळे सर (वाघापुर), इथापे मॅडम (राजुरी), खेडेकर मॅडम (जवळार्जून), पाटोळे मॅडम (निरा), सोनवणे सर (सासवड), जगताप मॅडम (पुण्यश्लोक अहिल्यादेवी जेजुरी), सागर चव्हाण सर (जिजामाता विद्यालय जेजुरी), शिंदे मॅडम (मांडकी), वाघमारे सर (पारगाव), तांदळे सर (भिवंडी), प्रमुख पाहुणे जिमाचे उपाध्यक्ष पांडुरंग सोनवणे यांनी विद्यार्थ्यांनी वकृत्व स्पर्धेत सहभाग घेतलाच पाहिजे, असे प्रतिपादन केले.
मोरगावातील शाळांना जय मल्हार क्रांती संघटनेतर्फे झाडे वाटप
ज्ञानाचे प्रतीक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य व त्यांनी केलेल्या संघर्षाबद्दल विद्यार्थ्यांनी सांगताना श्रोत्यांच्या अंगावर शहारे येतील, असे मनोगत व्यक्त केले. काळाच्या ओघात शेतकरी संपतोय, तो पोशिंदा आहे हे सांगताना विद्यार्थ्यांनी वातावरण भारावून टाकले. आजचा विद्यार्थी शिस्तप्रियच आहे, यावर सुंदर विचार भाषणातून मांडले.
या कार्यक्रमात पहिला क्रमांक इंदु इंग्लिश स्कुलची श्रेया हनुमंत काळाणे, दुसरा क्रमांक लिलावती कन्या शाळा येथील सृष्टी नितीन जगताप, तर तिसरा क्रमांक जिजामाता हायस्कुल जेजुरी येथील सृष्टी रविंद्र हिंगणे, तर उत्तेजनार्थमध्ये यशवंत विद्यालय मावडी समीक्षा विलास जगताप, केदारेश्वर विद्यालय काळदरी सृष्टी दौलत ढगारे, माध्यमिक विद्यालय राजुरी सायली संजय भगत, विद्या प्रशाला कोथळे समिक्षा राजेंद्र भोसले यांनी बक्षिस मिळवले.
उद्या बारामतीमधील जैन समाजाकडून बंदचे आवाहन
या कार्यक्रमाचे परिक्षक संजय जाधव सर, विद्यालयातील जितेंद्र खोपडे सर, रुपाली चाचर मिस, निलम कुंभार यांनी पाहिले. या कार्यक्रमासाठी परिक्षक म्हणुन काम पाहिले. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पुस्तके बक्षिस देऊन गौरविण्यात आले. विद्यालयाचे प्राचार्य पुरुषोत्तम रोटे सर व समन्वयक ठकसेन दुबळे सरांच्या मार्गदर्शना खाली शिक्षकांनी उत्कृष्ठ नियोजन केले होते. सुत्रसंचलन निलम मेमाणे यांनी केले, तर संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा इंदुमती कुटे व संस्थेच्या सचिव डॉ. मोनाली कुटे यांनी सर्व सहभागी व विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन केले.
One Comment on “इंदु स्कुलची श्रेया काळाणे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम”