श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, मुर्टी शाळेत दिंडी सोहळा साजरा

बारामती, 23 जूनः (प्रतिनिधी- बाळासाहेब बालगुडे) बारामती तालुक्यातील मुर्टी येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय शाळेत आषाढी एकादशीच्या औचित्य साधून आज, (शुक्रवार) 23 जून 2023 रोजी दिंडी सोहळा आणि ग्रंथ दिंडी आयोजित करण्यात आली. यामध्ये विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. आपल्या पारंपरिक वेशभूषेचा वापर करून सर्व विद्यार्थी अगदी आनंदाने दिंडीत सहभागी झाले होते. सर्व विद्यार्थी विठ्ठल नामाचा जप करत व ग्रंथांचे महत्त्व सांगत आनंदाने शाळा बाजारतळ, कॉलनी व पुन्हा शाळा अशी प्रभातफेरी दिंडीच्या स्वरूपात पार पडली.

श्री छत्रपती शिवाजी विद्यालय मुर्टी शाळेत योग दिन साजरा

या दिंडी सोहळ्यात सर्व शिक्षक वर्ग व इतरेत्तर कर्मचारी वर्ग यासह विद्यालयाचे मुख्याध्यापक काकडे सर सहभागी होते. या दिंडीमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी लेझीम फुगडी व रिंगणातील काही खेळ खेळून आपला आनंद व्यक्त केला. सांस्कृतिक विभाग प्रमुख तांबे मॅडम यासह सर्व सहकारी शिक्षिका अंबुले मॅडम, मोरे मॅडम, जाधव मॅडम, ठोबरे मॅडम, सहकारी शिक्षक लडकत सर, पाचपुते सर, दराडे सर आदींनी मुख्याध्यापक डी. जी. काकडे सर यांच्या मार्गदर्शनात हा दिंडी सोहळा पार पडला. यामध्ये विठ्ठलाच्या वेशभूषेत श्रेयश सचिन तांबे तर रुक्मिणीच्या वेशभूषेत तन्वी विशाल भोसले हे विद्यार्थी होते. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सारिका तांबे मॅडम यांनी केले

खासगी वसुली एजेंट गुंडांचा बारामतीत सुळसुळाट; सर्वसामान्यांना लुबडण्याचे वाढले धंदे!

One Comment on “श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, मुर्टी शाळेत दिंडी सोहळा साजरा”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *